News Flash

यशस्वी अभिनेत्री बनू शकली नाही म्हणून ती बनली चक्क पोकर प्लेअर

मिनिषाचे बॉलिवूडमध्ये बस्तान व्यवस्थित बसत नव्हते

मिनिषा लांबा

बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. २००५ मध्ये आलेल्या ‘यहां’ या सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाऱ्या मनीषाने ‘कॉर्पोरेट’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘दस कहानियां’ या सिनेमांमध्ये काम केले. पण तिला खरी ओळख मिळवून दिली ती २००८ मध्ये आलेल्या ‘बचना ए हसीनों’ या सिनेमाने. पण त्यानंतर तिच्या वाटेला फारसे काही चांगले सिनेमे आले नाहीत. त्यामुळे तिचे बॉलिवूडमधील करिअर हवे तसे यशस्वी होऊ शकले नाही. पण एकीकडे मार्ग बंद झाला तर तो दुसरीकडे उघडतोच. मिनिषाच्या बाबतीतही काहीसे असेच झाले. तिने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकून जुगाराला आपलेसे केले. आज ती भारताची पहिली प्रोफेशनल पोकर प्लेयर सेलिब्रिटी बनली आहे.

महिमा चौधरीच्या भावाचा आणि वहिनीचा अपघातात मृत्यू

मिनिषाचे बॉलिवूडमध्ये बस्तान व्यवस्थित बसत नव्हते. या दरम्यान तिने लास वेगास येथे पोकर खेळण्यास सुरुवात केली. सात वर्ष पोकर खेळल्यानंतर ती आता प्रोफेशन पोकर प्लेयर बनली आहे. त्याचबरोबर पहिली सेलिब्रिटी पोकर प्लेयर म्हणूनही तिच्याकडे बघितले जात आहे. एवढेच नाही तर मिनिषाची अड्डा५२ डॉट कॉम या पोकर वेबसाइटसोबत सर्व स्पर्धांच्या करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत. तिने आतापर्यंत लास वेगासमध्ये डब्ल्यूपीटी ५०० एरिया पोकर टुर्नामेंट, इंडियन पोकर चॅम्पियनशिप, हेल्टिन पोकर आणि गोव्यात झालेल्या कित्येक पोकर टूर्नामेंट्समध्ये सहभाग नोंदविला आहे.

१८ जानेवारी १९८५ मध्ये नवी दिल्ली येथे जन्मलेली मिनिषा हरियाणातील जाट परिवारातील आहे. तिच्या वडिलांचे नाव केवळ आणि आईचे नाव मंजू लांबा आहे. तिला एक लहान भाऊ असून, त्याचे नाव करण लांबा आहे. मनीषाने चेन्नई येथील चेत्तीनाद विद्याश्रम स्कूल आणि मिरांडा हाऊस युनिव्हर्सिटी येथून आपले शिक्षण पूर्ण केले. मिनिषाचे बॉलिवूड करिअर उतरतीला आले असतानाच तिने बॉयफ्रेंड रियान थाम याच्याशी लग्न केले. मनीषा आणि रियानची पहिली भेट २०१३ मध्ये त्यांच्या एका मित्राच्या माध्यमातून झाली. वृत्तानुसार पहिल्याच भेटीत त्यांच्यात प्रेम झाले होते. नंतर ते दोघे बऱ्याचदा पार्ट्यांमध्ये एकत्र बघावयास मिळाले. नात्याला दोन वर्षे दिल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी लग्न केले.

मिनिषा बिग बॉस-८ मध्येही सहभागी झाली होती. त्यावेळी तिचे आर्य बब्बरसोबत असलेल्या नात्याविषयीचे गुपित उघड झाले होते. जेव्हा ती बिग बॉसच्या घराबाहेर पडली होती तेव्हा तिने आर्याविषयी तिच्या मनात कुठलेच मतभेद नसल्याचे स्पष्ट केले होते. मिनिषाच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात तिचे शिक्षण घेताना सुरू झाली होती. मिनिषा जेव्हा दिल्लीच्या युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होती, तेव्हाच तिने मॉडलिंगला सुरुवात केली होती. त्यावेळी तिने अनेक ब्रॅण्डसाठी मॉडलिंगही केले होते.

नवाज, शाहरुख अडचणीत ५०० कोटींच्या घोटाळ्यात उघड झाले नाव

सध्या मिनिषा पोकर प्लेयर म्हणून आनंदाने जीवन जगत असून, या क्षेत्रात ती स्वत:ची ओळख निर्माण करीत आहे. त्यामुळे ती आता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार काय? याविषयी शंका आहे. दरम्यान मनीषाच्या चाहत्यांची तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये परतावे अशीच इच्छा असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 9:35 pm

Web Title: actress minissha lamba is professional poker player now
Next Stories
1 Jagga Jasoos Trailer: रागात कतरिनाने रणबीरच्या कानशिलात लगावली
2 महिमा चौधरीच्या भावाचा आणि वहिनीचा अपघातात मृत्यू
3 Mubarakan song Hawa Hawa: अर्जुन तिचा बॉयफ्रेंड बनण्यासाठी तयार
Just Now!
X