News Flash

मिथिला पालकरचा ‘हा’ डान्स पाहून तुमचेही पाय आपोआप थिरकतील

पाहा, मिथिलाचा बेधुंद डान्स

कपसाँगमुळे चर्चेत आली आणि पाहता पाहता वेबविश्वातील क्वीन झाली अशी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. अनेक वेब सीरिज आणि मराठी चित्रपटामुळे चर्चेत आलेली मिथीला सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये मिथिला फ्री स्टाइल डान्स करताना दिसत आहे.

मिथिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ‘बन ठन चली देखो’ या गाण्यावर फ्री स्टाइलमध्ये डान्स केल्याचं दिसून येत आहे. तसंच तिच्यासोबत या गाण्यावर युट्यूबर टीन नॉच हिनेदेखील ताल धरल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मिथिलाच्या या व्हिडीओ चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मिथिला सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असून ती कायम तिचे फोटो,व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 3:50 pm

Web Title: actress mithila palkar dance video viral on social media ssj 93
Next Stories
1 डॉ. प्रेमानंद रामाणींचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर; हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत
2 ‘सैराट’नंतर पुन्हा एकत्र येणार ‘ही’ जोडी
3 भारतीय जाहिरात पाहून ‘अंडरटेकर’ झाला भावूक; ‘डेडमॅन’लाही अश्रू अनावर
Just Now!
X