लॉकडाउनमुळे अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेक कलाकारांना याचा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे अनेकजण जमेल त्या पद्धतीने मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. अशातच एका अभिनेत्रीने चाहत्यांकडे मदतीसाठी हात पसरले आहे. या अभिनेत्रीकडे आईच्या उपचारासाठी ही पैसे उरलेले नाहीत.
ही अभिनेत्री म्हणजे नुपूर अलंकार आहे. सध्या नुपूरवर आर्थिक संकट कोसळले आहे. तिच्याकडे आईच्या उपचारासाठी देखील पैसे नाहीत. म्हणून तिने चाहत्यांकडे मदतीचा हात मागितला आहे. तिने क्राउड फंडिंगच्या माध्यमातून आर्थिक मदत मागितली आहे.
View this post on Instagram
नुपूरने आता पर्यंत अनेक छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केले आहे. तिन ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘स्वरागिनी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच या मालिकांमधील तिच्या भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळाले होते.
यापूर्वी नूपुरला पीएमसी बँकमुळे आर्थिक फटका बसला होता. तिचे बँकेतील अकाऊंट फ्रिज झाल्यामुळे तिच्याकडे फारसे पैसे नव्हते, डेबिट कार्ड- क्रेडिट कार्डही ब्लॉक झाले होते. त्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. म्हणून तिच्यावर दागिने विकण्याची वेळ आली होती. तिच्या मित्रमैत्रीणींनी देखील तिला मदत केल्याचे म्हटले जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2020 3:52 pm