आमच्या घरी अगदी पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. अभ्यंगस्नान, कारेट फोडण, फराळ, दिवे लावणे असा एकंदरीत सर्व घाट घातला जातो. दरवर्षी दिवाळीचे तीन दिवस मी काहीचं काम हातात घेत नाही. त्यामुळे यावर्षीही मी माझ्या कुटुंबियांसह दिवाळी साजरी करणार आहे. पण त्यानंतर लगेचच माझ्या आगामी चित्रपटाच्या शूटींगला मला जोमाने सुरुवात करायचीयं.
आमच्याकडे फराळ करताना फार मजा येते. खास करून, करंजा करण्याचा एक सोहळाचं आमच्याकडे असतो. मी पोळ्या करते तर बहिण सारण भरते आणि आई त्या करंज्या तळते. आईमुळे आम्हाच्यातही फराळ करण्याची आवड निर्माण झालेली आहे.  आम्हाला तर शिकवलचं आहे कोणत्याचं पदार्थाला नाही म्हणायचं नाही. त्यामुळे ‘डायट’ या शब्दालाचं आमच्याकडे बंदी आहे. मी कधीचं डायट करत नाही. जे मिळेल ते खाते आणि दिवाळीत तर फराळाचा विशेष आनंद लुटते.
शब्दांकन- चैताली गुरव