18 September 2020

News Flash

…त्यामुळे मी कोशात गेले होते – प्रिया बापट

या सीरिजमध्ये ती पहिल्यांदाच एका वेगळ्या रुपात दिसून येणार आहे

प्रिया बापट

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रिया बापट आता नागेश कुकुनूर यांच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या हिंदी वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून तिने डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण केले असून या सीरिजमध्ये ती पहिल्यांदाच एका वेगळ्या रुपात दिसून येणार आहे.

”सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजमध्ये प्रियाने पौर्णिमा गायकवाड या कणखर आणि महत्वकांक्षी मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. ” ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजचं कथानक राजकारणाभोवती फिरणारं असून आपल्या वडिलांचे राजकीय अस्तित्व आणि त्यांचे तत्व जपण्यासाठी पौर्णिमा राजकारणात उतरते. राजकारणात उतरल्यानंतर पौर्णिमाची लढत तिच्याच सख्या भावासोबत होते.यापूर्वी मी कधीही अशी भूमिका साकारलेली नाही. त्यामुळेच सहाजिकचं ही व्यक्तिरेखा साकारताना मला बरीच मेहनत करावी लागली”, असं प्रियाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी माझ्या वागण्या-बोलण्यात बदल करणे आवश्यक होते. याशिवाय या भूमिकेत शिरण्यासाठी मला स्वतःला मानसिकदृष्टया तयार करणे खूप महत्वाचे होते. मी माझ्याच कोशात राहिले. शक्यतो बाहेर जाणे टाळले. अशा लोकांच्या सहवासात राहिले, ज्यांना माझ्या या तयारीची, मेहनतीची जाण आहे. खूप शांत, संयमी राहण्याचा सतत प्रयत्न केला. माझ्या व्यक्तिरेखेबद्दचा नागेश सरांचा दृष्टिकोन आणि ते मला या भूमिकेत कसे बघतात, त्यांच्या या व्यक्तिरेखेकडून काय अपेक्षा आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी मी त्यांना सतत भेटले. एकंदरच ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. शिवाय इतक्या दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभवसुद्धा खूपच छान होता”.

प्रियाने आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. मात्र व्यक्तिगत जीवनात प्रियाची प्रतिमा एक अवखळ मुलगी अशी आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखेची गरज असलेली परिपक्वता आणण्यासाठी प्रियाने बरीच मेहनत घेतली. घर सांभाळणारी सर्वसाधारण गृहिणी ते सत्ता सांभाळणारी जिद्दी, महत्वकांक्षी राजकारणी. प्रियाच्या अशा दोन वेगळया छटा या वेबसीरिजमधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. भावासोबत असणाऱ्या या राजकीय खेळीत कोण विजयी होईल, हे मात्र ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ पाहिल्यावरच कळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 2:45 pm

Web Title: actress priya bapat gets candid about webseries
Next Stories
1 ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ला भारतात उदंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी भरघोस कमाई
2 मोदींच्या मुलाखतीनंतर ‘या’ व्यक्तीची प्रतिक्रिया माझ्यासाठी खास -अक्षय कुमार
3 राजकारणात का आला सनी देओल ?, गदरच्या दिग्दर्शकांनी सांगितलं कारण
Just Now!
X