News Flash

अभिनेत्री रेचल व्हाइटला करोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती

वाचा, पोस्ट शेअर करत रेचल काय म्हणाली..

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्या देशभरातील जनता त्रस्त झाली आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीला करोनाची लागण झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली आहे.

‘उंगली’ आणि ‘हर हर ब्योमकेशी’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रेचल व्हाइट हिला करोनाची लागण झाली आहे. रेचलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

“मी करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या घरीच क्वारंटाइन झाले आहे. मला लवकर बरं व्हायचं आहे. त्यामुळे प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा”, असं पोस्ट शेअर करत रिचेल म्हणाली.

दरम्यान, रेचलने पोस्ट केल्यानंतर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या कलाविश्वातील अनेकांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच बिग बी आणि अभिषेक बच्चन यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. तर अनुपम खेर यांच्या आईला आणि कुटुंबातील अन्य तीन सदस्यांना करोना झाल्याचं समोर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 5:52 pm

Web Title: actress rachel white tests covid 19 positive ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नेपाळचे पंतप्रधान बिग बींसाठी करतायत प्रार्थना; म्हणाले…
2 अमित साध करणार करोना चाचणी? वाचा नेमकं काय आहे प्रकरण
3 जयसाठी विरूची प्रार्थना! बिग बींना करोना झाल्यामुळे धर्मेद्र चिंतेत
Just Now!
X