News Flash

‘लॉकडाउनच्या प्रेमात’असं म्हणत राधिका आपटेने शेअर केला बिकिनीतला फोटो

हा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे

फोटो सौजन्य-(राधिका आपटे इंस्टाग्राम पेज )

करोनाशी मुकाबला करण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. ३ मेपर्यंत लॉकडाउन आहेच. तो पुढे वाढणार की नाही हे चित्रही येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. अशात लॉकडाउनमध्ये कलाकारांपासून, राजकीय नेत्यांपर्यंत आणि सामान्य माणसांपर्यंत सगळे घरीच आहेत. लॉकडाउनच्या प्रेमात अभिनेत्री राधिका आपटे पडली आहे… आणि हेच वाक्य पोस्ट करत तिने एक बिकिनीतला फोटोही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. राधिकाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

‘लॉकडाउनच्या प्रेमात पडले आहे’ या आशयाचं वाक्य पोस्ट करत पोलका डॉट बिकिनीमधला फोटो राधिका आपटेने पोस्ट केला आहे. हा फोटो अर्थातच जुना आहे. काही दिवसांपूर्वीच करीना कपूरनेही सैफ आणि तैमूरसोबतचा समुद्र किनाऱ्यावरचा एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता. आता राधिका आपटेनेही स्वतःचा बिकिनीमधला एक फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Loving the locked down #mindgames #nocoronaintheocean #sociallydistantdivingdesire #dreamingoftheocean

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

#dreamingoftheocean असा हॅशटॅगही तिने वापरला आहे. बिकिनीतला जुना फोटो पुन्हा शेअर करत तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. राधिका आपटेने सेक्रेड गेम्स, घुल यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. तर मांझी द माऊंटन मॅन, कबाली, बदलापूर, पॅडमॅन या सिनेमातील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 2:56 pm

Web Title: actress radhika apte shares her bikini photo and said loving the lockdown scj 81
Next Stories
1 संजय दत्तच्या पहिल्या पत्नीचा फोटो पाहून मान्यता म्हणाली…
2 लॉकडाउनमध्ये सलमानच्या वडिलांना मॉर्निग वॉकसाठी प्रशासनानं दिला पास, कारण…
3 …म्हणून मनोज वाजपेयी ‘लो बजेट’ चित्रपटांना देतो प्राधान्य
Just Now!
X