28 September 2020

News Flash

Video : सिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतप्त

रवीना प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायम आवाज उठवत असते

चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतलेली अभिनेत्री रविना टंडन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते. रविना अनेक वेळा या माध्यमातून समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करते. त्यातच आता एका सिंहाच्या तोंडावर काही व्यक्तींनी केक फासल्यामुळे रविना संतापली असून तिने सोशल मीडियावर तिचा राग व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक एका सिंहाच्या चेहऱ्यावर केक फासतांना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रविना प्रचंड संतापली असून तिने तिचा राग व्यक्त केला आहे. रवीना प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायम आवाज उठवत असते. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिने नाराजी व्यक्त केली आहे. तिने एका खास अंदाजामध्ये ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे.

“मला असं वाटतं, की लोकांचं कर्म आपल्या ‘नागिन’ चित्रपटासारखं त्यांच्यासमोर यावं”, असं ट्विट रविनाने केलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ एका युजरने शेअर केला असून त्यानेदेखील संताप व्यक्त केला आहे. प्राण्यांसोबत असं करणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडावर हा केक फासण्याची गरज असल्याचं या युजरने म्हटलं होतं. तेव्हापासून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 2:47 pm

Web Title: actress raveena tandon twitter reaction cake on lion face ssj 93
Next Stories
1 Father’s Day 2019 : या पाच चित्रपटांशिवाय ‘फादर्स डे’ आहे अपूर्ण
2 Confirm! सायनाच्या बायोपिकमध्ये परिणीतीची वर्णी
3 कंगना सांगतेय, सोशल मीडियापासून लांब असण्याचं कारण
Just Now!
X