24 October 2020

News Flash

रिचा चड्ढाने सांगितले भांगचे फायदे, नेटकऱ्यांनी सुनावले

तिच्या या दाव्यावरून वाद निर्माण झाला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच सुशांतला ड्रग्सचे व्यसन होते अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडूनही याप्रकरणी तपास सुरु आहे. तर दुसरीकडे सुशांतसोबत डिसेंबर २०१८ ते फेब्रवारी २०१९ या कालावधीत काम करणाऱ्या एका व्यक्तीने सुशांत ड्रग्सचे सेवन करत नव्हता असे सांगितले. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने ट्विट करत मारिजुआना (गांजा) घेण्याचे फायदे सांगत वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर तिच्या या दाव्यावरून वाद निर्माण झाला असून ट्विटरवर काही युजर्सनी तिला खडे बोल सुनावले आहेत.

नुकताच रिचा चड्ढाने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ती मारिजुआनाला ड्रग्स बोलणााऱ्यांवर संतापली आहे. ‘ज्या वेळी संपूर्ण देशात मारिजुआनाचे (गांजा) औषधी फायदे समोर येत आहेत तेव्हा आपल्यातले काही अडाणी त्यांना ड्रग्सची उपमा देत आहेत. कृपया थोडा अभ्यास करा आणि निसर्गाकडून मिळालेल्या भेटीचा अपमान करु नका. अज्ञानी लोकांना आपल्याला लाभलेला वारसा आणि विश्वासाचा अपमान करण्याचा अधिकार नाही’ या आशयाचे ट्विट रिचा चड्ढाने केले आहे.

तिच्या या दाव्यावरून वाद निर्माण झाला असून ट्विटरवर काही युजर्सनी तिला खडे बोल सुनावले आहेत.

गांजाचा वापर वैद्यकीय क्षेत्रात केला जातो हे जरी खरं असलं तरी त्याचा वापर मर्यादित स्वरुपात करणे अपेक्षित असते. तुम्ही मनात येईल तेव्हा गांजाचं सेवन करणे हे व्यसनच आहे. बहुधा तूच आधी थोडा अभ्यास करणे गरजेचे असून अर्धवट ज्ञान हे कधीही घातकच आहे, असे खडेबोल एका ट्विटर युजरने सुनावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 4:57 pm

Web Title: actress richa chadha tweets benefits of marijuana and get trolled avb 95
Next Stories
1 मक्याचं कणीस ट्विट करत बिग बींनी सांगितलं यशाचं गमक; फोटो होतोय व्हायरल…
2 तारक मेहता फेम दिशा वकानी ‘बिग बॉस’मध्ये झळकणार का? निर्मात्यांनी दिलं आमंत्रण
3 अश्लील कॉमेंट करणाऱ्या ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली; करणार कायदेशीर कारवाई
Just Now!
X