News Flash

अभिनेत्री रिद्धिमा पंडितच्या आईचे करोनामुळे निधन

त्या ६८ वर्षांच्या होत्या

देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. या आजारामुळे दररोज होणाऱ्या मृत्युंची संख्याही मोठी आहे. छोट्या पडद्यावरची अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्या आईचेही करोनाने निधन झाले आहे. याबद्दल रिद्धिमाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रिद्धिमाच्या आई ६८ वर्षांच्या होत्या. त्या अनेक वर्षांपासून किडनीच्या समस्येने त्रस्त होत्या. आपल्या आईला गमावल्याचं दुःख तिने एका पोस्टमधून व्यक्त केलं आहे. यात ती म्हणते, “मम्मा, मॉम्झी, छोटी बेबी, अशीच मी तुला हाक मारायचे. मी तुला खूप जास्त मिस करत आहे पण मला तुझ्या अस्तित्वाची जाणीव आहे. तुझ्यासोबतच घालवलेला प्रत्येक क्षण तू आमच्यासाठी मागे सोडला आहेस. तुझं संपूर्ण आयुष्य तू आमच्यासाठी वेचलंस. त्यासाठी तुझे आभार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ridhima Pandit (@ridhimapandit)

रिद्धिमा पुढे लिहिते, “मी आता माझ्या मित्रमैत्रिणींना हे सांगू शकणार नाही की आईने बनवलेलं गुजराती जेवण पाठवतेय…मी कधी तुझ्याकडून स्वयंपाकही नाही शिकले. कुणास ठाऊक माझी मुलं आता काय खातील? पण मी मात्र स्वतःला अजूनही लहान मूलच समजते. हा विचारही करवत नाही की आता मी तुझ्या हातची चव चाखू शकणार नाही.”

रिद्धिमाच्या भावूक करणाऱ्या या पोस्टवर तिच्या अनेक मित्रांनी आणि सहकलाकारांनी सांत्वनपर कमेंट्स केल्या आहेत. तिच्या चाहत्यांनीही तिचं सांत्वन केलं आहे.

आपल्या आईबद्दलच्या या पोस्टमध्ये रिद्धिमा पुढे लिहिते, “तुझं नाव आता माझ्या फोनवर फ्लॅश होणार नाही. औषधं घेतली नाहीत म्हणून किंवा वेळेवर नीट जेवली नाहीस म्हणून आता मी तुला ओरडू शकणार नाही. स्वतःला त्रास होत असतानाही आयुष्यातली शेवटची पाच वर्षे तू फक्त माझ्यासाठी जगलीस. मला माहित आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की तुझं सगळं दुःख, सगळा त्रास आता संपला. मी तुला तिथे वर चमकताना पाहू शकत आहे. आम्हा सर्वांना तुझा आशिर्वाद सदैव लाभो. आता काहीच त्रास नाही. फक्त आराम. मला माहित आहे तू सदैव माझ्या सोबत असशील.”

रिद्धिमा ‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेतून प्रसिद्ध झाली होती. २०१९ साली ती ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये सहभागी झाली होती आणि फायनलपर्यंतही पोहोचली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 5:32 pm

Web Title: actress riddhima pandit mother passed away due to corona vsk 98
Next Stories
1 ‘रात्रीस खेळ चाले’; “नाईक परिवाराखडसून तुमका सगळ्यांका…”
2 हा गुढीपाडवा साजरा करा ‘गुढीपाडवा फिल्म फेस्टिवल’ सोबत
3 ‘हा’ अभिनेता होणार अमिताभ बच्चन यांचा मुलगा; सोशल मीडियावरुन दिली माहिती
Just Now!
X