सध्या अनेक कलाकार हे लग्न बंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अस्ताद काळे, अभिज्ञा भावे यांच्या पाठोपाठ आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार असल्याचे दिसत आहे. ही अभिनेत्री म्हणजे रुचिता जाधव.

‘लव्ह लग्न लोचा’मधील अभिनेत्री रुचिता ३ मे रोजी लग्न करणार आहे. ती मुंबईतील व्यावसायिक आनंद मानेशी लग्न करणार आहे. पंचगणी येथील एका फार्महाऊसवर तिचे लग्न होणार आहे. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडणार आहे.

Bhagyashree Mote separated from vijay palande
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
prithvik pratap, sayali sanjeev, suhas sirsat will play role in Dia Mirza new short film panha
दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये मराठी कलाकारांची वर्णी, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यासह झळकणार ‘ही’ अभिनेत्री
Marathi actress Gautami Deshpande share chilhood memories
‘या’ गोंडस चिमुकलीला ओळखा पाहू! मराठी सिनेसृष्टीतली ही लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच अडकली लग्नबंधनात

आणखी वाचा : अभिषेक बच्चनसोबत होणाऱ्या तुलनेवर प्रतिक गांधी म्हणाला…

नुकतीच रुचिताने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अरेंज मॅरेज करत असल्याचे म्हटले आहे. ‘गेल्या वर्षी लॉकडाउन होण्याआधी आम्ही भेटलो होता. आमचे अरेंज मॅरेज आहे. आम्ही भेटलो तेव्हा मी फार कोणत्या गोष्टींचा विचारही केला नव्हता. कारण त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या लग्नासाठी तयार नव्हते’ असे रुचिता म्हणाली.

पुढे रुचिता म्हणाली, ‘मी चित्रीकरणामध्ये व्यग्र होते. त्यामुळे मला आनंदला फार वेळ देता आला नाही. पण तो नेहमीच माझ्यासाठी वेळ काढायचा. डिसेंबर २०२०मध्ये आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.’

रुचिताने ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेत काम केले आहे. तसेच ‘भुताचं हनिमून’ आणि ‘माणूस एक माती’ या चित्रपटांमध्ये ती भूमिका साकारताना दिसली होती. आता रुचिता ३ मे रोजी लग्न बंधनात अडकणार आहे.