News Flash

रुपाली भोसलेचा ‘कार’नामा; फोटो शेअर करत म्हणाली…

रुपालीने शेअर केली खास पोस्ट

बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले आहेत. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीची सोशल मीडियावर कायचम चर्चा रंगत असते. यामध्येच सध्या चर्चा रंगली आहे ती रुपालीच्या एका बर्थ डे गिफ्टची. काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. विशेष म्हणजे या वाढदिवशी रुपालीने स्वत:लाच एक छान गिफ्ट दिलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या रुपालीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ही ग्लॅमरस अंदाजात दिसत असून तिच्या बाजूला एका लॅविश कार असल्याचं पाहायला मिळत आहे.

रुपालीने तिच्या वाढदिवसानिमित्त स्कोडा या कंपनीची कार खरेदी केली असून त्याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. सोबतच एक खास कॅप्शनदेखील दिलं आहे. आणि ती इथे आहे. ती फक्त चारचाकी किंवा इंजिन नाहीये, तर माझ्यासाठी ते घर आहे. ही डुग्गू मी स्वत:लाच वाढदिवसाची भेट म्हणून दिली आहे. स्वागत आहे. माझ्या कारलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं कॅप्शन रुपालीने या पोस्टला दिलं आहे.

आणखी वाचा- काय?? फक्त १५ मिनिटांसाठी उर्वशी रौतेलाने घेतलं इतक्या कोटींचं मानधन

दरम्यान, रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती, ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत संजना ही भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 3:00 pm

Web Title: actress rupali bhosle gifted herself brand new car ssj 93
Next Stories
1 दिशा पटानीचा बिकिनी फोटो व्हायरल; फक्त दोन तासांत मिळाले इतके लाख लाइक्स
2 रणबीर-आलिया साखरपुडा करणार?; काका रणधीर कपूर यांनी केला खुलासा
3 माहेरी रंगणार वहिनींच्या खेळाचा डाव; ‘होम मिनिस्टर सन्मान माहेरवाशिणीचा’ लवकरच
Just Now!
X