News Flash

Photo : समीरा रेड्डीचं अंडरवॉटर प्रेग्नंसी फोटोशूट

समीरा नऊ महिन्यांची गरोदर आहे आणि तिने अंडरवॉटर फोटोशूट केलं आहे.

समीरा रेड्डी

प्रेग्नंसी फोटोशूटसाठी आजकाल नवनवीन कल्पना वापरल्या जातात. बीचवर, गार्डनमध्ये किंवा मग याहूनही भन्नाट कल्पना. अभिनेत्री समीरा रेड्डीनेही अशीच एक अनोखी शक्कल लढवली आहे. ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. समीरा नऊ महिन्यांची गरोदर आहे आणि तिने अंडरवॉटर फोटोशूट केलं आहे.

२००२ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या समीराचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. त्यानंतर तिने आपला मोर्चा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीकडे वळविला. तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

आणखी वाचा : दिशासोबत डिनर डेटला गेल्यावर बिल कोण भरतं? टायगर म्हणतो..

समीराने २१ जानेवारी २०१४ मध्ये उद्योजक आणि ‘वर्देची’ या सुपरबाइक्स कंपनीचा मालक अक्षय वर्देसोबत लग्न केल. समीराला एक मुलगा असून तिने २५ मे २०१५ रोजी पहिल्या बाळाला जन्म दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 5:26 pm

Web Title: actress sameera reddy goes for underwater photoshoot at her 9th month of pregnancy ssv 92
Next Stories
1 हे आहेत हृतिकच्या आयुष्यातील ‘सुपर टीचर्स’
2 अल्लू अर्जुनने घेतली सलमान-शाहरुखपेक्षाही महागडी व्हॅनिटी व्हॅन
3 दिशासोबत डिनर डेटला गेल्यावर बिल कोण भरतं? टायगर म्हणतो..