News Flash

रक्षाबंधन विशेषः मीच माझ्या भावाला गिफ्ट देते- संस्कृती बालगुडे

इतर भावांप्रमाणे वेळात वेळ काढून बहिणीसाठी आपण काहीतरी घेऊया असं त्याला कधीचं वाटत नाही

यंदा बहुतेक मी रक्षाबंधन दिवशी घरी नसेन. माझं शूट असल्याने मी बाहेर असणार आहे. माझा भाऊ समर्थ माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे.  खरंतर रक्षाबंधनला भावाने बहिणीला काहीतरी द्यायचं असत. पण यावेळी मीच त्याला दोन गिफ्ट्स द्यायचे बाकी आहेत. तो यंदा फर्स्ट क्लासने ग्रॅज्युएट झाला आहे. त्याचसोबत त्याचं लॉच्या मेरिट लिस्टमध्येही नाव आलयं. त्यामुळे मीच त्याला दोन गिफ्ट्स देणार आहे. मला जर वेळ मिळाला तर नक्कीच मी घरी जाण्याचा प्रयत्न करेन.

समर्थ माझ्यापेक्षा फक्त वयाने लहान आहे. पण तो मोठ्या भावासारखा नेहमी माझ्या पाठीशी असतो. माझ्या प्रत्येक निर्णयात तो मला साथ देतो. माझे आई वडिलांशी करियरवरून किंवा इतर काही कारणावरून कधी वाद झालेच तर तो माझ्या पाठीशी उभा राहतो. लहान असताना त्याला माझ्यासाठी काय गिफ्ट घ्यायचं ते कळायच नाही म्हणून तो आईकडून पैसे घेऊन मला द्यायचा. आताही तो मला विशेष भेट देत नाही. इतर भावांप्रमाणे वेळात वेळ काढून बहिणीसाठी आपण काहीतरी घेऊया असं त्याला कधीचं वाटत नाही. त्यामुळे मीच त्याला गिफ्ट देते. पण तो स्वतःहून कधीच माझ्याकडे काही मागत नाही. त्याला काय हवं असेल हे ओळखून त्याप्रमाणे मी त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेतेचं.

संस्कृती बालगुडे लवकरचं सैराट या चित्रपटाने प्रसिद्धीस आलेला अभिनेता आकाश ठोसर याच्यासोबत चित्रपटात झळकणार आहे.  महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘फु’ या चित्रपटात त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर, आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे आणि माधुरी देसाई यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा आजच्या तरुणाईचे राहणीमान आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत यावर भाष्य करणारी असल्याचे कळते. ती याच चित्रपटाच्या शूटींगकरिता मॉरिशस, इटली येथे फिरत होती. संस्कृती सोशल मिडीयावर सक्रीय असून ती आपल्या चित्रपटांबाबत  त्यावरून माहिती देत असते.

शब्दांकन- चैताली गुरव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 9:41 am

Web Title: actress sanskruti balgude talking about his little brother 2
Next Stories
1 रक्षाबंधन विशेषः पंकजाक्षीने स्वकर्तृत्वाने ओळख निर्माण केली- सिद्धार्थ जाधव
2 धोनीच्या चित्रपटाचा ट्रेलर मराठीत
3 टीव्हीवरची प्रादेशिक विविधता
Just Now!
X