05 July 2020

News Flash

शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये सान्या मल्होत्रा साकारणार ‘ही’ भूमिका

या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका असणार आहे

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा कायमच आपल्या अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मन जिंकत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन अवघा काही काळ लोटल्यानंतरच ‘पटाखा’ आणि ‘बधाई हो’ असे लोकप्रिय चित्रपट तिच्या पदरात पडले. इतकंच नाही तर या चित्रपटांमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीतही उतरली. त्यामुळेच चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची प्रकर्षाने वाटत पाहत असल्याचं दिसून आलं. त्यातच आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सान्या लवकरच प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

‘सान्या या चित्रपटामध्ये शकुंतला देवी यांच्या मुलीची भूमिका साकारणार असून विद्या बालन शकुंतला देवींची व्यक्तीरेखा साकारणार आहे. सान्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. ‘मी शकुंतला देवी यांची मुलगी अनुपमा बॅनर्जी यांची भूमिका साकारणार असल्यामुळे मी प्रचंड आनंदी आणि तितकीच शुटींगसाठी उत्साहित आहे’, असं कॅप्शन देत सान्याने एक व्हिडीओ शेअर केला.

‘प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्याविषयी साऱ्यांनाच माहित आहे. या आई-लेकीची जोडी स्क्रीनवर साकारण्यासाठी आणि विद्या बालन यांच्यासोबत काम करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे’, असंही सान्या म्हणाली.

शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन अनु मेनन करत असून या चित्रपटामध्ये विद्या बालन शकुंतला देवी यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. त्यातच काही दिवसापूर्वी या चित्रपटातील विद्याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. हे पोस्टर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ते सोशल मीडियावर शेअर केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 9:04 am

Web Title: actress sanya malhotra will be seen as vidya balan daughter in shakuntala devi biopic ssj 93
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या आयुष्यावरील ‘मोती बाग’ची ऑस्करच्या दारावर थाप
2 एकता कपूर म्हणाली… “मुलाला सांगेन तुला वडिलच नाहीत”
3 मीना मंगेशकरांची ‘मोठी तिची सावली’ आता हिंदीत
Just Now!
X