News Flash

‘मी सर्जरी केली नाही’, शमा सिकंदरने केला खुलासा

एका मुलाखतीत शमाने केला खुलासा

अभिनेत्री शमा सिकंदर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शमा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे शमा नेहमीच चर्चेत असते. शमाचे बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे तिला बऱ्याच वेळा ट्रोलही करण्यात आले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शमाने याच उत्तर दिलं आहे.

नुकतीच शमाने ई-टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सर्जरी केली बोलणाऱ्या ट्रोलर्सना सुनावले आहे. “मी प्लास्टिक सर्जरी केली नाही. माझ्याबद्दल लोक असे का बोलतात मला माहित नाही. कारण ही फक्त एक कॉस्मॅटिक प्रक्रिया आहे. लोकांनी माझे आधीचे फोटो पाहिले आहेत. त्यावेळी माझ्या शरीररचनेत काही बदल होत होते. पण यानंतर माझ्यात काही बदल दिसला तर मला सांगा”, असे शमा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

शमाने या आधी एकदा ‘Then & Now’ असा फोटो शेअर केला होता. त्या फोटोवरून शमा ट्रोल झाली होती. त्यावर ती म्हणाली, “मी योग्य व्यायाम करते. मी व्यवस्थीत जेवते आणि मेडिटेशन देखील करते. माझ्या त्वचेवर जो बदल आहे हा यामुळेच झाला आहे. जेव्ही मी इंडस्ट्रीपासून लांब गेली तेव्हा पासून लोकांनी मला बघितले नव्हते. त्यावेळी मी नैराश्येशी झगडत होते. मी बोटॉक्स ट्रीटमेंट केली. मात्र, त्यात सर्जरी करत नाही. मी प्लास्टिक सर्जरी केली नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

शमा पुढे म्हणाली, “एखाद्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने प्लास्टिक सर्जरी केली असेल, तर लोकांना त्यातून काही फरक पडला नाही पाहिजे. शेवटी तो त्यांच्या मेहनतीचा पैसा आहे. लोकांचे स्वत:चे विचार, त्यांची स्वत:ची मतं असू शकतात. आता तर मला ट्रोल्सचा फरक पडतं नाही. मला त्यांची काळजी नाही. याचे पूर्ण श्रेय हे मी रोज करत असलेल्या मेडिटेशनला देते. मेडिटेनशमुळे मी खूप शांत राहते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

शमाने १९९८मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळी ‘प्रेम अगन’, ‘मन’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये शमाने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. २००३ मध्ये ती छोट्या पडद्यावर आली आणि तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 5:10 pm

Web Title: actress shama sikander reveals she did not have any plastic surgery and opted only for botox dcp 98
Next Stories
1 अनिकेतच्या परतण्याने मानसीला मिळणार बळ, ‘पहिले न मी तुला’ एका वेगळ्या वळणावर
2 अभिनेत्री उपासना सिंह विरोधात पोलिसात तक्रार दाखल
3 ट्विटरच्या कारवाईनंतर कंगनाने केला वर्णद्वेषाचा आरोप, म्हणाली, “अमेरिकेला असं वाटतं की…”
Just Now!
X