News Flash

करोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीलाच करोनाची लागण

६ महिन्यांपासून शिखा करोना रुग्णांची सेवा करत आहे

गेल्या सहा महिन्यांपासून करोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणारी अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिला करोनाची लागण झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून शिखा मुंबईतील एका रुग्णालयात कोविड रुग्णांची सेवा करत होती. मात्र, याच दरम्यान तिची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

शिखा जोगेश्वरीमधील हिंदूहृदय सम्राट ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहे. करोना काळ सुरु झाल्यानंतर करोनाग्रस्तांची सेवा करण्यासाठी तिने पुढाकार घेतला होता. त्यामुळे अभिनय सोडून ती गेल्या सहा महिन्यांपासून बीएमसीतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात काम करत होती. मात्र, याच काळात तिलादेखील करोनाची लागण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

आप सभी का प्रेम देख निशब्द हूँ आप सभी की प्रार्थना से मैं फिर एक बार अपनी PPE kit पहन #covid19 के ख़िलाफ़ इस जंग में उतर कई ज़रूतमंदों की सेवा कर पाऊँगी मुझे पूरा भरोसा है पता ही नहीं चला की मम्मी पापा को देखे बिना कब छ: महिने बीत गए इस जंग में और ये सभी patients ही मेरे लिए मेरा परिवार बन गए और मैं जुट गई दिल से इन्हें हँसाने इनकी सेवा करने में निरंतर तत्पर पर बस अब मम्मी पापा का देखे बिना मन नहीं मानता पर सदैव आप सभी का साथ व अथाह प्रेम देख मन को सब्र आ जाता है कोशिश करूँगी वक्त वक्त पर अपनी फ़ोटोज़ पोस्ट कर आपकी चिंता दूर करती रहूँ अभी रिकवर होने में थोड़ा समय लगेगा बस आप सभी साथ बनाए रखिए जय हिंद #coronafighternurse #versatile #actress #shikhamalhotra @kaanchlithefilm @dedipya_official @shobha_official

A post shared by Shikha Malhotra (@shikhamalhotraofficial) on


“लवकरच मी या संकटावर मात करेन आणि पुन्हा एकदा करोना रुग्णांची सेवा करण्यासाठी तत्पर असेन”, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. शिखाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं.

दरम्यान, शिखाने वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये २०१४ मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले आहे. मात्र, शिक्षणानंतर तिने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावलं. परंतु, करोना काळात रुग्णांची सेवा करण्यासाठी ती पुन्हा एकदा तिच्या मूळ क्षेत्राकडे वळल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 1:02 pm

Web Title: actress shikha malhotra who has been serving as nurse for past 6 months tests covid 19 positive ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आदिपुरुष चित्रपटात अजय देवगण दिसणार ‘या’ भूमिकेत?
2 काजल अगरवालच्या साखरपुड्याचा फोटो; होणाऱ्या पतीने केला पोस्ट
3 धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्याला अटक; आर. माधवनने केली कठोर शिक्षेची मागणी
Just Now!
X