06 March 2021

News Flash

शिवानी रांगोळेचं नवं मिशन

‘सांग तू आहेस का’ मालिकेतील भूमिकेसाठी शिवानी शिकतेय दुचाकी

अभिनेत्री शिवानी रांगोळेने एक नवं मिशन हाती घेतलं आहे. हे मिशन आहे ते दुचाकी चालवण्याचं. स्टार प्रवाहवर भेटीला येणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतल्या भूमिकेसाठी शिवानी दुचाकी चालवायला शिकते आहे. शिवानीसाठी हा अनुभव नवा आहे.

या नव्या मिशनविषयी सांगताना शिवानी म्हणाली, “सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला खूप मदत केली. मालिकेत मी वैभवी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. दुचाकीवरचे बरेचसे सीन असल्यामुळे मी दुचाकी चालवायला शिकायचं ठरवलं. सेटवर वेळ मिळाला की माझा सराव सुरु असतो. मला खूप आनंदही होतोय की भूमिकेच्या निमित्ताने मला नवी गोष्ट शिकता आली.”

पाहा फोटो : पाटी पात्रो आणि बऊ भात…मराठमोळ्या सईचं बंगाली लग्न

हॉरर आणि रोमान्स असा अनोखा मिलाफ असणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ मालिकेतल्या शिवानीच्या नव्या लूकचीही चर्चा आहे. ही नवी मालिका ‘सांग तू आहेस का’ ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 6:18 pm

Web Title: actress shivani rangole learning new things for her upcoming marathi serial sang tu aahes ka ssv 92
Next Stories
1 मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘लेट्सफ्लिक्स’ लवकरच..
2 ‘OTT वर सेन्सॉरशीप लादू नका, अन्यथा…’; श्रेया बुगडेनं व्यक्त केली भीती
3 ‘तू गांजाची शेती करतेस का?’; शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी प्रियांका होतेय ट्रोल
Just Now!
X