News Flash

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतल्या ‘या’ अभिनेत्रीला झाली करोनाची लागण

तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे. कमी वेळात तिने भरपूर प्रसिद्धी मिळवली. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. देशभरात वाढणाऱ्या करोनाच्या प्रादुर्भावाचा फटका आता तिलाही बसला आहे. अभिनेत्री शिवानी रांगोळेला करोनाची लागण झाली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे.

आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये ती म्हणते, “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केलं असून योग्य ती सर्व काळजी घेत आहे आणि माझ्या डॉक्टरांच्या संपर्कात आहे. ज्यांना बाहेर जावं लागत आहे, त्यांनी कृपया स्वतःची काळजी घ्या. तुमच्या कामाच्या ठिकाणची स्वच्छता तुमच्या हातात नाही पण तुमच्या आरोग्यासोबत कोणतीही तडजोड करु नका.” या सोबतच शिवानीने सर्वांना घरात राहण्याचाही सल्ला दिला आहे.

शिवानीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नी रमाई यांची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. या भूमिकेमुळेच ती घराघरात पोहोचली. अनेकजण तिचे चाहते झाले. सध्या ‘ती सांग तू आहेस ना’ या मालिकेतूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही दिसत आहे. ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

तिने यापूर्वी अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे. त्यासोबत ‘अँड जरा हटके’, ‘फुंतरु’, ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिने ‘योलो’, ‘बनमस्का’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकांमध्येही काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 12:26 pm

Web Title: actress shivani rangole tested positive for covid 19 vsk 98
Next Stories
1 पुष्कर जोगचा ‘सुरक्षित’ गुढीपाडवा!
2 “इतकी गचाळ का राहतेस?”, ट्रोल करणाऱ्या महिलेला हेमांगी कवी म्हणाली…
3 ‘अंतर्वस्त्र परिधान करायला विसरलीस’; BAFTA मधील लूकमुळे प्रियांका ट्रोल
Just Now!
X