News Flash

‘इश्कबाज’फेम अभिनेत्री श्रेनू पारिखला करोनाची लागण

इन्स्टाग्रामवर पोस्ट करत श्रेनूने दिली माहिती

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रेनू पारिख हिला करोनाची लागण झाली आहे. श्रेनूने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. काही दिवसापूर्वी श्रेनूला करोनाची लागण झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसंच तिच्यात हळूहळू तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

“काही दिवसांपूर्वी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी रुग्णालयता अॅडमिट असून हळूहळू माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी देवाकडे प्रार्थना करा. मी मनापासून करोना वॉरियर्सचे आभार मानते. या कठीण प्रसंगात ते प्रत्येक रुग्णाची व्यवस्थित काळजी घेत आहेत”, असं श्रेनूने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे ती म्हणते, “जर योग्य काळजी घेऊन सुद्धा जर तुम्हाला करोनाची लागण झाली तर असं समजा की एक अदृश्य राक्षस तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला त्याच्याशी लढायचं आहे. त्यामुळे कृपया काळजी घ्या”.

दरम्यान, श्रेनू छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘भ्रम…सर्वगुण संपन्न’ या मालिकेतून तिने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘इश्कबाज’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘दिल बोले ओबेरॉय’, ‘ब्याह हमारी बहु’ या मालिकांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 11:56 am

Web Title: actress shrenu parikh tested corona positive recovering in the hospital ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 …जेव्हा अंकिताने सुशांतला केलं होतं प्रपोज; थ्रोबॅक व्हिडीओ होताय व्हायरल…
2 ‘या’ कारणामुळे प्रिती आणि राणीच्या मैत्रीमध्ये पडली होती फूट?
3 अमिताभ बच्चन यांनी कवितेतून केला डॉक्टरांना सलाम
Just Now!
X