News Flash

गरजुंच्या मदतीसाठी ‘दबंग गर्ल’ आली पुढे; कलेच्या माध्यमातून करणार आर्थिक सहाय्य

वाचा, सोनाक्षीने कोणता निर्णय घेतला आहे

सध्या देश करोना विषाणूसारख्या गंभीर समस्येला सामोरा जात आहे. या काळात अनेक संकंट उभी ठाकली आहेत. काहींना करोनाची लागण झाली आहे, तर काहींची लॉकडाउन असल्यामुळे उपासमार होत आहे. त्यामुळे या गरजुंच्या मदतीसाठी आतापर्यंत अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. या कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. अनेकांनी त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे गरजुंना मदत केली आहे. यामध्ये आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मदतीसाठी पुढे सरसावली आहे.

सोनाक्षीने तिच्या कलेच्या माध्यमातून गरजुंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षी तिच्या आर्टवर्कचा लिलाव करणार आहे. यात तिने रेखाटलेले चित्र, डिजिटल प्रिंट्स याचा लिलाव करणार असून त्यातून जमा होणारी रक्कम ती गरजुंच्या मदतीसाठी वापरणार आहे. सोनाक्षीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.


“मी फ्रॅकाइंड ऑफिशियलच्या मदतीने एक टीम तयार केली आहे. ही टीम मी रेखाटलेले चित्र, पेटिंग्ज यांचा लिलाव करतील आणि त्यातून जमा होणारी रक्कम गरजुंसाठी वापरतील. या रक्कमेमधून आम्ही गरजू लोकांसाठी अन्नधान्य पुरवणार आहोत”, असं सोनाक्षीने ट्विट केलं आहे.

दरम्यान, या ट्विटसोबत सोनाक्षीने तिच्या आर्टवर्कचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. तिचं हे आर्टवर्क पाहिल्यानंतर सोनाक्षी अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम चित्रकार असल्याचं लक्षात येतं. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी गरजुंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यात सलमान खान, सोनू सुद, शाहरुख खान यांचं नाव आवर्जुन घेतलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 12:20 pm

Web Title: actress sonakshi sinha to help daily wage laborers in corona crisis ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘कहानी घर घर की’ मालिकेतील अभिनेत्याचं निधन
2 ..म्हणून अनन्याने सुहानाकडे उधारीवर मागितला टॉप
3 “राजकीय नेत्याशी माझं लग्न झालेलं नाही”; लग्नाच्या अफवांवर सोनालीचं स्पष्टीकरण
Just Now!
X