News Flash

अफजल गुरू बळीचा बकरा; सोनी राझदान यांचं वादग्रस्त वक्तव्य

२००१ मध्ये अफझल गुरूनं संसदेवर हल्ला केला होता.

संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफजल गुरूला बळीचा बकरा बनवण्यात आला होता, असा आरोप अभिनेत्री सोनी राझदान यांनी केला आहे. जम्मू काश्मीरचे निलंबित पोलीस उपाधीक्षक दविंदर सिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सोनी राझदान आणि महेश भट्ट यांनी ट्विटरवरून त्यांच्या अटकेवर आक्षेप घेतला. २००१ मध्ये अफझल गुरूनं संसदेवर हल्ला केला होता. आता त्याच्या फाशीला सात वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर आता सोनी राझदान यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

अफझल गुरूची पत्नी तबस्सुमनं दविंदर सिंह यांनी आपल्या पतीच्या सुटकेसाठी १ लाख रूपये मागितल्याचा दावा केला होता. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान दविंदर सिंह यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आला आहे.

सोनी राझदान यांनी अफजल गुरूच्या फाशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एखादा व्यक्तींचं निर्दोषत्व सिद्ध झालं तर त्याचा जीव परत कसा आणणार? मृत्यूदंडाची शिक्षा सहजरित्या दिली जाऊ नये. अफझल गुरूला बळीचा बकरा बनवलं गेलं याची चौकशी करण्यात यावी, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

अफझल गुरूच्या फाशीनंतर दविंदर सिंह यांना का सोडण्यात आलं, याचीदेखील चौकशी करण्याची मागणी सोनी साझदान यांनी केली आहे. अफझल गुरूसारख्या लोकांवर कसा अत्याचार केला जातो आणि गुन्हेगारांसाठी दहशतवादी कारवाया करण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा कशी मिळते, याचीही चौकशी व्हायला हवी, असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 2:55 pm

Web Title: actress soni razdan tweet about afzal guru death penalty jud 87
Next Stories
1 जम्मू-काश्मीर: अवंतिपोरा चकमकीत दोन दहशतवादी ठार, दोन सैनिक जखमी
2 पेरियार यांच्याविषयी केलेल्या विधानावरून रजनीकांत यांच्याविरोधात संताप
3 पाकिस्तानात गव्हाच्या पीठाची तीव्र टंचाई, पोळी, नान नसल्याने भूक भागेना
Just Now!
X