27 November 2020

News Flash

‘महेश भट्ट यांची सीबीआय चौकशी का नाही?’; सुचित्रा कृष्णमूर्तीचा सवाल

सुचित्रा कृष्णमूर्तीने व्यक्त केला संताप

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा सीबीआयची विशेष टीम तपास करत आहे. आतापर्यंत सीबीआयने या प्रकरणी अनेकांची चौकशी केली आहे. या चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासादेखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, सीबीआयने अद्याप महेश भट्ट यांची चौकशी का केली नाही, असा प्रश्न अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिने उपस्थित केला आहे.

सुचित्रा कृष्णमुर्तीने ट्विट करत महेश भट्ट यांची चौकशी का करण्यात येत नाही, असा प्रश्न विचारला आहे. “सीबआयने महेश भट्टला चौकशीसाठी बोलावलं आहे? जेव्हा रियाने सुशांतचं ८ जून रोजी घर सोडलं, तेव्हा ते इतके एडमन्ट का करत होते?”, असं ट्विट सुचित्राने केलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अनेकांनी चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तसंच त्यांच्यावर घराणेशाहीचे आरोपदेखील करण्यात आले आहेत. त्यातच मध्यंतरी रिया आणि महेश भट्ट यांच्याचील मेसेज चॅटदेखील समोर आले होते. त्यामुळे सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी अनेकांनी महेश भट्ट यांच्यावर आरोपप्रत्यारोप केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:49 pm

Web Title: actress suchitra krishnamoorthi has questioned the role of mahesh bhatt in the relationship between late actor sushant singh rajput ssj 93
Next Stories
1 काम सुरु करण्यापूर्वी अभिषेक बच्चनने केला हेअरकट, हृतिकने केली कमेंट
2 “मी सत्याच्या बाजूने उभी”; रियाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रीचं ट्रोलर्सला उत्तर
3 हिना खानला करायचं होतं ‘या’ क्षेत्रात करिअर; पण…
Just Now!
X