29 November 2020

News Flash

तापसीने साजरा केला मितालीचा वाढदिवस, दिलं खास गिफ्ट

भारतीय महिला क्रिकेटला जगात ओळख मिळवून देण्यात मितालीचा महत्त्वाचा वाटा

भारतात क्रिकेट हा एक धर्म मानला जातो. क्रिकेटविषयी भारतात ज्यावेळी चर्चा केली जाते, तेव्हा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि पुरुष संघाचा विषय रंगतो. पण एका महिला खेळाडूने मात्र भारतातील महिला क्रिकेटला आपल्या फलंदाजी आणि नेतृत्वकौशल्याने वलय मिळवून दिले. भारतीय महिला क्रिकेटला सर्वोच्च स्थानावर नेणाऱ्या मिताली राज हिचा हा ३७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त बॉलिवूडची अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिच्यासोबत वाढदिवस साजरा केला आणि त्याचा फोटोही शेअर केला.

मितालीचा जन्म ३ डिसेंबर १९८२ ला राजस्थानमधील जोधपूर शहरात झाला. यावेळी बॉलिवूडची ‘मिताली राज’ म्हणजेच तापसी पन्नू हिने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तापसीने केवळ मितालीचे अभिनंदनच केले नाही, तर तिच्यासोबत तिचा वाढदिवसदेखील साजरा केला. तापसीने ट्विटरवर काही फोटो शेअर केले. महत्त्वाचे म्हणजे त्यातच तापसीने मितालीच्या बायोपिकची घोषणादेखील केली.

मिताली राज

मितालीने केक कापल्याचे फोटो तापसीने शेअर केले. त्या फोटोंसोबत तिने कॅप्शनदेखील लिहिले आहे. कॅप्शनमध्ये तिने मितालीला वचन दिले की स्वत:चा (मितालीचा) बायोपिक पडद्यावर पाहून तिला तिचा अभिमान वाटेल. ” कर्णधार मिताली, तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. मी तुला यंदाच्या वाढदिवशी काय गिफ्ट द्यावे हे मला माहिती नाही. मी तुला काय देऊ शकते तेदेखील मी सांगू शकत नाही, पण मी वचन देते की #शाबाशमिथू या बायोपिकच्या माध्यमातून माझ्या रूपात स्वतःला पडद्यावर पाहिल्याने तुला अभिमान वाटेल”, असे तिने ट्विटमध्ये लिहिले आहे.

याचसोबत तिने तळटीप देखील लिहिली आहे. ‘मी सर्व ‘कव्हर ड्राइव्ह’ शिकण्यास तयार आहे’, असे तापसीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 12:01 pm

Web Title: actress taapsee pannu celebrates cricketer mithali raj birth day announces biopic shabaash mithu vjb 91
Next Stories
1 टीम इंडियाची गोलंदाजी ‘लय भारी’, पण… – रिकी पॉन्टींग
2 IPL 2020 : १९ तारखेला लिलाव प्रक्रिया; जाणून घ्या कोणत्या देशाचे किती खेळाडू मैदानात
3 स्वत:च्या बायोपिकमध्ये सौरव गांगुलीला हवा ‘हा’ अभिनेता
Just Now!
X