13 December 2017

News Flash

विद्या बालनचा हा मजेशीर व्हिडिओ पाहिलात का?

व्हिडिओला ५ हजारांहून अधिक लाइक्स आले

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 1, 2017 12:41 PM

विद्या बालन

अभिनेत्री विद्या बालनने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विद्याने जो व्हिडिओ शेअर केला तो कोणत्याही सिनेमाचा नाही किंवा गाण्याचाही नाही. या व्हिडिओमध्ये ती मजेशीर हालचाली करताना दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये विद्या, गादीच्या खुर्चीवरुन उड्या मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने उड़ी- उड़ी कहां- कहां मैं उड़ी इत्तेफाक से! हे गाण्याचे बोलही लिहिले आहेत. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला ५ हजारांहून अधिक लाइक्स आले आहेत.

Udi Udi kaha kaha, kaha main Udi Udi Ittefaq Se!! 😜🤣

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

Marr diya jaay ya phone kiya jaay…Bol tere saath kya sulook kiya jaay?!! 🤣

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

‪14th April it is !! 🙂‬

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

याआधी विद्याने तिचा आगामी बेगम जान या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल सांगितले होते. या सिनेमाचे पहिले पोस्टर तिने ट्विटरवर शेअरही केले होते. बेगम जान हा सिनेमा १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सृजित मुखर्जी याच्या दिग्दर्शनामध्ये बनलेल्या या सिनेमाची निर्मीती महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी केली आहे. बेगम जान हा बंगाली सिनेमा राजखानी याचा रिमेक आहे. या सिनेमात विद्या एका देहविक्रेय घरातली प्रमुख दाखवण्यात आली आहे. या सिनेमात भारत- पाकिस्तानमध्ये झालेल्या विभाजनाची पाश्वभूमीही मांडण्यात आली आहे. विद्यासोबतच या सिनेमात नसीरुद्दीन शाह आणि गोहर खान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

First Published on February 15, 2017 7:17 pm

Web Title: actress vidya balan share funny video jumping ottoman