News Flash

भारताचा व्हिसा मिळवण्यासाठी या अभिनेत्रीला २० लाखाचा गंडा

एका मुलाखती दरम्यान या अभिनेत्रीने या गोष्टीचा खुलासा केला आहे

आपल्या डान्स मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. सध्या नोरा ‘ओ साकी साकी’ गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमुळे चर्चेत आहे. हे गाणे जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘बाटला हाउस’ मधील आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून या गाण्यातील दिलखेचक अदांनी नोराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु नोराचा कॅनडा ते बॉलिवूड चित्रपटसृष्टी हा प्रवास फार खडतर झाला असल्याचे नोराने एका मुलाखती दरम्यान सांगितले.

पिंकव्हिलासह झालेल्या एका मुलाखतीमध्ये नोराने तिला बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागल्याचे सांगितले. ‘मी सुरुवातीला हिंदी शिकत होते पण मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. लोक माझ्या बोलण्यावर हसत, तोंडावर माझी खिल्ली उडवायचे. मला फार वाईट वाटत असे. घरी जाताना मला रोज रडायला यायचं. मी आयुष्यात हे कधीच विसरणार नाही’ असे नोरा म्हणाली. दरम्यान अनेकांनी तर नोराला ‘आम्हाला तुझी गरज नाही तू तूझ्या देशात परत जा’ असे देखील सुनावले होते.

त्यानंतर ज्या एजन्सीने नोराला कॅनडाहून भारतात आणले त्याच एजन्सीने तिला २० लाखांचा गंडा घातल्याचे सांगितले आहे. ‘मला माझी पहिली एजन्सी आठवते जिने मला कॅनडाहून भारतात आणले. त्यांची वर्तवणूक अतिशय चुकीची आणि मला दिशाभूल करणारी होती. त्यामुळे मी त्यांची मदत न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या एजन्सीला मी तसे कळवताच त्यांनी माझे २० लाख रुपये परत न देण्याचा दावा केला’ असे नोरा म्हणाली.

नोराचे नुकताच ‘बाटला हाउस’ चित्रपटातील ‘ओ साकी साकी’ गाणे प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार असून पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 12:55 pm

Web Title: actress who lost 20 lakhs for indian visa avb 95
Next Stories
1 Photo : ‘ही तर अश्लीलतेची हद्दच’; गौरी खानला फोटोवरून नेटकऱ्यांनी फटकारले
2 रोहित शर्माने विराटनंतर अनुष्कालाही केलं अनफॉलो
3 किडनी प्रत्यारोपणावर राणा डग्गुबत्ती म्हणतो..
Just Now!
X