News Flash

जातिवाचक शब्दांचा उल्लेख करणं अभिनेत्री युविका चौधरीला महागात; नेटकऱ्यांकडून अटकेची मागणी

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

(photo-instagram@Yuvikachaudhary)

काही दिवसांपूर्वीच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो मधील बबीताजी म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ताने जातिवाचक शब्दांचा वापर करत समाजातील काही लोकांचा अपमान केल्य़ाचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर देशभरातून मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी होऊ लागली होती. मुनमुन दत्ताने सोशल मीडियावरून माफी मागितली असली तरी लोकांमधील संताप कमी झालेला नाही. हे प्रकरण शांत होण्याआधीच आता अभिनेत्री युविका चौधरीन जातिवाचक शब्दांचा उल्लेख केल्याने नेटकरी आणखी संतापले आहेत.

रोडिस् फेम प्रिन्स नेरुलाची पत्नी अभिनेत्री युविका चौधरी चांगलीच चर्चेत आलीय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून युविकाच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. युविका सोशल मीडियावर अनेक व्लॉग शेअर करत असते. यातील तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून या व्हिडीओवर संताप व्यक्त केला जातोय.

या व्हिडीओत युविकाचा पती प्रिन्स एका खुर्चीत बसलेला दिसतोय. तो हेअर स्टाईल करत असताना युविका हा व्हिडीओ शूट करताना दिसतेय. समोर आरसा असल्याने युविका व्हिडीओ शूट करताना स्पष्ट दिसतेय. यावेळी ती नेहमी व्हिडीओ शूट करताना मला छान तयार होता येत नाही असं बोलतेय. “नेहमी मी व्लॉग बनवते. तेव्हा मी का नेहमी **** सारखी येऊन उभी राहते. मला वेळचं मिळतं नाही की मी स्वत: ला व्यवस्थित दाखवू शकेन. मला खूप वाईट वाटतंय आणि हा मला व्लॉगसाठी वेळ देत नाही.” असं ती यात म्हणतेय. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच युविकाने जातिवाचक शब्दांचा उल्लेख केलाय.

युविकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी तिच्या अटकेची मागणी करू लागले आहेत. या व्हिडीओवर एक युजर म्हणालाय, “युविका चौधरीला अटक होणं गरजेचं आहे. म्हणजे त्या किमान लोकांमध्ये उदाहरण ठरतील. युविका आणि मुनमुनसारख्या अशा अनेकजणी असतील.”
तर दुसरा युजर म्हणालाय, “नंतर ती म्हणेल की तिला अर्थ माहित नव्हता. बरं, ठीक आहे. तुरुंगात गेल्यानंतर तुझी माफी स्विकारली जाईल. ”

अनेक नेटकऱ्यांनी ट्विट करत युविकाच्या अटकेची मागणी केलीय. त्यामुळे ट्विटरवर देखील #ArrestYuvikaChoudhary हा ट्रेंड सध्या पाहायला मिळतोय. अनेक नेटकऱ्यांनी विविध मीम्स शेअर करत संताप व्यक्त केलाय. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मुनमुन दत्ताने जातीवाचक शब्दांचा उल्लेख केल्याने तिला नेटकऱ्यांच्या संतापाला समोरं जावं लागलं होतं. तर देशात अनेक ठिकाणी मुनमुन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 12:11 pm

Web Title: actress yuvika chaudhary trending on soacil media for her arrest as she used casteist comment kpw 89
Next Stories
1 लेकाची बाजू घेत उदित नारायण यांनी साधला अमित कुमार यांच्यावर निशाणा
2 प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार Money Heist चा पाचवा सीझन
3 ‘अशा’ अवतारात कुणाल खेमू पहिल्यांदा सोहा अली खानच्या आईला भेटला
Just Now!
X