23 July 2019

News Flash

‘ती माझं चारित्र्यहनन करतेय’; अभिनेत्री झरीन खानची पोलिसांकडे तक्रार

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानातील कलम ५०९ अंतर्गत (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार किंवा कृती करणे) गुन्हा दाखल केला आहे.

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री झरीन खानने माजी मॅनेजर अंजली अथ विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. चारित्र्यहनन केल्याप्रकरणी झरीनने ही तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानातील कलम ५०९ अंतर्गत (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार किंवा कृती करणे) गुन्हा दाखल केला आहे.

झरीन खानने गुरुवारी रात्री खार पोलीस ठाण्यात तिची आधीची मॅनेजर अंजली अथविरोधात तक्रार दाखल केली आहे. ३१ वर्षीय झरीनने तक्रारीत म्हटले आहे की, ‘अंजलीने सिनेसृष्टीत माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी गॉसिप्स पसरवले. अंजलीसोबतचा करार मोडल्यानंतरही अंजलीने मला फोनवर धमकीचे आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवले.’ हा प्रकार इथेच थांबला नाही. करार संपुष्टात आल्यानंतरही अंजलीने माझ्या नावावर सिनेसृष्टीतील लोकांकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोपही झरीनने तक्रारीत केला आहे.

झरीनचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. झरीनने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस तपासातून तथ्य बाहेर येईलच असे त्यांनी सांगितले. तर अंजलीच्या वतीने या वृत्तावर अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अंजलीने झरीनपूर्वी कंगना रनौत आणि ह्रतिक रोशन यांच्यासोबतही काम केले आहे.

झरीन खानचा जानेवारीत ‘१९२१’ हा भयपट प्रदर्शित झाला होता. विक्रम भट यांचा हा सिनेमा होता. झरीन खानने सलमानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. हाऊसफूल २, हेट स्टोरी ३, अकसर २ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

First Published on December 7, 2018 9:51 am

Web Title: actress zareen khan filed case against her former manager anjali for tarnishing her image