26 February 2020

News Flash

फिट राहण्यासाठी ‘या’ पाच अभिनेत्रींचं योगसाधनेला प्राधान्य

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज फिटनेसच्या बाबतीत अनेकांची आयडियल आहे

शारीरिक व मानसिक स्वास्थ मिळावे यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करण्याची गरज आहे, असा सल्ला अनेक वेळा योगाभ्यासक देतात. विशेष म्हणजे सध्या पाहायला गेलं तर आजची तरुण पिढीदेखील योगाभ्यासाला महत्व देत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, जे नियमितपणे योगा आणि व्यायाम करतात. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं.

१. शिल्पा शेट्टी –
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज फिटनेसच्या बाबतीत अनेकांची आयडियल आहे. शिल्पा नियमितपणे योगा आणि व्यायाम करत असून तिच्या आयुष्यामध्ये योगाला विशेष महत्व असल्याचं वारंवार दिसून येतं. एका मुलाची आई असून सुद्धा शिल्पाने स्वत:ला फिट ठेवलं आहे. तिच्या या फिट राहण्याचं सारं श्रेय तिने योगाला दिलं आहे. तिच्या जीवनामध्ये योगाचं अनन्यसाधारण महत्व असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा तिने काही व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांना योगाचं प्रशिक्षणही दिलं आहे. त्यातच तिने आता चाहत्यांसाठी शिल्पा शेट्टी नावाचा खास योगा करण्याकरता अॅप लॉन्च केला आहे.

२. मलायका अरोरा –
वय हा केवळ आकडा आहे हे अभिनेत्री मलायका अरोराकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. वयाची ४० ओलांडल्यानंतरही मलायका आज एखाद्या २५ वर्षाच्या तरुणीप्रमाणे भासते. मलायका नियमितपणे योगा करत असल्यामुळे ती आजही फिट आहे. अनेक वेळा मलायका सोशल मीडियावर तिच्या योगाचे आणि व्यायामाचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असते.

३. आलिया भट्ट-
स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आलिया भट्ट ही आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असल्याचं समजलं आहे. कधी काळी प्रचंड हेल्दी असणारी आलिया आता फिट आणि स्लिम असल्याचं पाहायला मिळतं. आलियानेदेखील इतर अभिनेत्रींप्रमाणे योगाला महत्व दिलं आहे. आलिया आठवड्यातून २ वेळा अष्टांग योगा करते.त्यासोबतच ती मेडिटेशनही करते.

४. बिपाशा बासू-
बॉलिवूडमधील फिटनेस फ्रीक या नावाने प्रसिद्ध असलेली बिपाशा बासू कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. बिपाशा नियमितपणे योगा करते. सोशल मीडियावरही ती तिच्या योगाचे तसेच एक्सरसाईजचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. योगामध्ये कपालभाती, अनुलोम- विलोम, मंडूकासन हे बिपाशाचे आवडते योगा प्रकार आहेत.
५. कविता कौशिक –
चंद्रमुखी चौटाला या नावाने घराघरात पोहोचलेली कविता कौशिकलादेखील योगाची प्रचंड आवड आहे. कविता ३८ वर्षांची असून गेल्या अनेक वर्षांपासून ते योगा करत आहे.

First Published on June 18, 2019 12:23 pm

Web Title: actresses who do yoga to stay fit ssj 93
Next Stories
1 मणिरत्नम यांची प्रकृती सुखरूप, कार्डिअॅक अरेस्टच्या चर्चा खोट्या
2 शाहरुखसोबतच्या वादावर अखेर सनी देओलने सोडलं मौन
3 अंधत्वावर मात करण्यासाठी बिग बींची ‘See Now’ मोहीम
Just Now!
X