देशात करोनाचा प्रदुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २४ मार्च रोजी सर्वात मोठी घोषणा केली. त्यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. हा लॉकडाउन २१ दिवसांसाठी असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिक हे घरात बसल्याचे पाहायला मिळत आहेत. याला बॉलिवूड कलाकार देखील अपवाद नाहीत. पण हे बॉलिवूड कलाकार सध्या घरात बसून अनेक कामे करताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री अदा शर्माने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. अदाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एक्ससाइज करता-करता घरातील साफ सफाई करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने 'तुम्ही ज्या मित्रांना अशा रुपात पाहू इच्छिता. त्या सर्वांना हा व्हिडीओ टॅग करा. अनेकांना वेळे आभावी एक्ससाइज करायला मिळत नाही. तुमच्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. जर एक्ससाइज करताना फोन वाजत असेल तर फोन बुलाता है मगर जाने का नही. तसेच सध्या घरात सुरक्षित रहा' असे कॅप्शन दिले आहे. View this post on Instagram Tag all your friends who should do this today ! . Creative katka adah_ki_adah style ! . Many of you will say no time to exercise now because we have to clean our houses ..I have a solution for that katka-mein-bhi-adah . If the phone rings don't succumb to the weapon of mass distraction bulate hai aur jaa bhi sakte hai.lekin corona ke baad till then stay home , stay safe, stay clean #bulatehaimagarjaosirfcoronakebaad . #creativekatkaadahstyle #katkaadah #corona #katkameinbhiadah #adahsharma #workout #workoutmotivation #workoutathome . P.s.these hands don't just play the piano Shot by @adah_ki_radha A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah) on Mar 24, 2020 at 5:05am PDT यापूर्वी क्वारंटाइनमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा भांडी धुतानाचा आणि सिद्धार्थ मल्होत्राचा जेवण बनवत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. तर सैफ अली खान आणि तैमूर झाडे लावताना दिसला. तर दुसरी कडे दिपीका पियानोचे धडे घेताना दिसत आहे.