News Flash

काय?? साडी नेसून अदा शर्माची कार्टव्हील उडी; पाहा व्हिडीओ

अदाचा हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या करिअरसोबतच फिटनेसच्या बाबतीतही तितक्याच सजग असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा त्या त्यांचा वेळ जीममध्ये वर्कआऊट करण्यात घालवतात. या वर्कआऊटचे अनेक फोटो किंवा व्हिडीओदेखील त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. यात अभिनेत्री अदा शर्मा तिच्या फिटनेसकडे कटाक्षाने लक्ष देत असल्याचं दिसून येतं. सध्या सोशल मीडियावर अदाच्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये तिने चक्क साडी नेसून कार्टव्हील उडी मारली आहे.

अदाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा हा कार्टव्हील उडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने गुलाबी रंगाची साडी नेसली असून तिने कार्टव्हील उडी मारली आहे. विशेष म्हणजे साडीमध्ये अशी उडी मारणं अत्यंत कठीण आहे.मात्र, अदाने सहजरित्या हे केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. समुद्र किनाऱ्यावर अदाने कार्टव्हील उडी मारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

आणखी वाचा- अस्सं माहेर नको गं बाईमध्ये समीर चौघुलेची एण्ट्री; साकारणार ‘ही’ भूमिका

दरम्यान, अदा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती एका शॉर्ट फिल्म आणि तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. ती ‘1920’ या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अदाने ‘हंसी तो फसी’,’कमांडो 3′ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 10:14 am

Web Title: adah sharma cartwheel stunt on beach video viral on internet ssj 93
Next Stories
1 करमणूक कर केला रद्द; ‘या’ राज्यात बजेटपूर्वीच आनंदाचं वातावरण
2 अस्सं माहेर नको गं बाईमध्ये समीर चौघुलेची एण्ट्री; साकारणार ‘ही’ भूमिका
3 विरूष्काच्या मुलीचा First Photo आला समोर
Just Now!
X