News Flash

अदा शर्माने साधला घराणेशाहीवर निशाणा; सांगितले स्टार किड्स नसण्याचे फायदे

बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात आणखी एका कलाकाराने उठवला आवाज

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला जात आहे. सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान अभिनेत्री अदा शर्मा हिने देखील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. तिने एका व्हिडीओद्वारे स्टार किड्स नसण्याचे फायदे सांगितले आहेत.

अवश्य पाहा – चित्रपटांची होम डिलिव्हरी; हे ‘सात’ चित्रपट प्रदर्शित होणार हॉटस्टारवर

अदाने इन्स्टाग्रामवर एका हॉरर चित्रपटातील व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर कॉमेंट करताना तिने स्टार किड्स नसण्याचे फायदे सांगितले आहेत.

अवश्य पाहा – ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’मधून जॅक स्पॅरोला केलं बाहेर; ही अभिनेत्री साकारणार मुख्य व्यक्तिरेखा

 

View this post on Instagram

 

The Benefits of NOT being a star kid : in Allllll my interviews im asked my take on Nepotism and Star Kids…we are always talking about the struggle ,but here are some perks of being a non star kid . 1)Getting the opportunity to stand in long audition lines leading to long toned legs . 2)Getting free bonus acting classes with real life experience of a rollercoaster of emotions like rejection and dejection . 3)A chance to do a big banner film and  yet be invisible on the poster ! No name also full incognito! . 4)To not be included in promotions of a film . so you can practice sulking and crying expressions at home(tab Hasee toh nahi aae Look at star kid cat Radha Sharma @adah_ki_radha …she had to lose 10 kgs ,it’s only been a year since she’s born and she has to deal with all this fame uffffff! The Struggle is Reel, Really ! . Repost : @vidyutjamwalion.s (video cred) p.s.I don’t have a God Father but I think God is on my side I got to do horror,action,romance,drama,comedy all in one film,my debut 1920 #100yearsofAdahsharma #1920to2020

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah) on

“मला अनेक मुलाखतींमध्ये घराणेशाहीबाबत प्रश्न विचारले जातात. आणि मी माझ्या स्ट्रगलच्या गोष्टी सांगते. खरं तर स्टार किड्स नसण्याचेही काही फायदे आहेत. १) तुम्हाला ऑडिशनचा अनुभव घेता येतो. २) सतत होणाऱ्या रिजेक्शनमुळे तुमचा अनुभव वाढतो. तसंच फुकटचे अॅक्टिंग क्लासेस मिळतात. ३) एका मोठ्या बॅनरच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही चित्रपटात अदृश्य होऊ शकता. ४) तुम्हाला चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सामिल केलं जात नाही अशा परिस्थितीत तुम्ही घरात बसून रडण्याचा अभ्यास करु शकता.” अशा आशयाची कॉमेंट अदाने लिहिली आहे. अदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 2:51 pm

Web Title: adah sharma comments on bollywood nepotism mppg 94
Next Stories
1 “पैशांसाठी भाजी विकत नव्हतो, तर..” व्हायरल व्हिडीओवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण
2 “बेकार व्हिडीओंच्या त्रासातून वाचले”; टिक-टॉक बॅन केल्यामुळे मलायका आनंदी
3 चिनी अ‍ॅप्स बॅन करणं हे करोना घालवण्यासाठी टाळ्या वाजवण्यासारखंच; विशाल दादलानीची टीका
Just Now!
X