बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान अभिनेता अध्ययन सुमन याने सुशांत प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “सुशांत माझा मित्र नव्हता, मी त्याला ओळखतही नव्हतो परंतु तरीही सुशांतबाबत विचार करुन मी अस्वस्थ होतो. त्याचा सतत विचार केल्यामुळे आता मला झोप देखील लागत नाही.” असं तो म्हणाला.

अवश्य पाहा – ड्रग्स प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक; समोर आली आणखी १५ नावं

The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

अध्ययन सुमनची ‘आश्रम’ ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या सीरिजच्या निमित्ताने एनडीडीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अध्ययनने सुशांत मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं. तो म्हणाला, “सुशांतचा मृत्यू ही अत्यंत दुदैवी घटना आहे. त्याच्या मृत्यूची बामती ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता. सुशांतला मी वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो. त्याला कधी भेटलोही नव्हतो. पण त्याचे काही चित्रपट पाहिले होते. तो खरंच एक उत्तम अभिनेता होता. माणूसकीच्या नात्याने मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं. तसंच चौकशीत जी काही माहिती समोर येतेय त्यामुळे मला अस्वस्थ व्हायला होतं. रात्रीची झोप देखील लागत नाही. मला खात्री आहे सीबीआय या प्रकरणातील खरे गुन्हेगार लवकरच शोधून काढेल.”

अवश्य पाहा – “किसिंग करण्यास नकार दिल्यामुळे चित्रपटातून काढलं”; अभिनेत्रीने सांगितला चकित करणारा अनुभव

शोविक चक्रवर्तीसह दोघांना अटक

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली. चक्रवर्ती कुटुंबातील ही पहिलीच अटक आहे. या घडामोडीमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविकनंतर एनसीबी रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे. शोविक, मिरांडा यांनी सुशांतला अंमलीपदार्थाच्या नशेची सवय लावून अंमलीपदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. दोघांच्या अटकेला एनसीबीचे उपसंचालक के पीएस मल्होत्रा यांनी दुजोरा दिला. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.