News Flash

या ज्येष्ठ अभिनेत्रीमुळे अदितीला मिळाली खिल्जीच्या पत्नीची भूमिका

अदितीच्या अभिनयाची प्रेक्षकांकडूनही प्रशंसा होत आहे.

अदिती राव हैदरी

सध्या बॉक्स ऑफीसवर संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट जोरदार कमाई करत आहे. ज्या चित्रपटावरून इतका वाद झाला, त्यातील कलाकारांच्या अभिनयाचीही प्रेक्षक-समीक्षकांकडून प्रशंसा होत आहे. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग या मुख्य भूमिकांशिवाय जिम सर्भ आणि अदिती राव हैदरी या साहाय्यक भूमिकांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. अलाउद्दीन खिल्जीची पत्नी मेहरुनीस्साची भूमिका अदितीने साकारली. या भूमिकेसाठी जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी भन्साळींकडे आपलं नाव सुचवल्याची माहिती अदितीने दिली.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, ‘जया बच्चन यांनी माझं नाव सुचवल्याने मी त्यांची आभारी आहे. इंडस्ट्रीमध्ये मला यापूर्वी कधीच अशा प्रकारची साथ मिळाली नव्हती. ज्या व्यक्तींचा मी इतका आदर करते, ते जेव्हा माझ्या बाजूने उभे राहतात आणि मला प्रोत्साहन देतात, तेव्हा त्याचा आनंद अनोखाच असतो.’

वाचा : रणवीरच्या अतरंगी फॅशन सेन्सविषयी कतरिना म्हणते..

विशेष म्हणजे, जया बच्चन हे अदितीचे डोळे पाहून प्रभावित झाल्याचे तिने या मुलाखतीत सांगितले. अदितीची भूमिका काही फार मोठी नव्हती. पण ज्या दृश्यांमध्ये ती झळकली, त्याला तिने न्याय दिला असं म्हणायला हरकत नाही. तिचे अभिनय आणि सौंदर्याला प्रेक्षकांचीही दाद मिळत आहे. करणी सेनेच्या तीव्र विरोधानंतर ‘पद्मावत’ प्रदर्शित झाला आणि पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने जगभरात २०० कोटींची कमाई केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 6:54 pm

Web Title: aditi rao hydari opens up on padmaavat says thanks to this veteran actress
Next Stories
1 ‘हम आपके है कौन’च्या सिक्वलमध्ये या जोडीला पाहायला तुम्हालाही आवडेल
2 हे राम! म्हणत नथुराम घेणार कायमची एग्झिट
3 भूषण आणि पल्लवीच्या स्वप्नांचा प्रवास
Just Now!
X