25 January 2021

News Flash

‘आदित्य १० वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता’; उदित नारायण यांचा खुलासा

उदित नारायण यांनी आदित्य-श्वेताविषयी केला 'हा' खुलासा

बॉलिवूड अभिनेता, गायक आदित्य नारायणने नुकतीच श्वेता अग्रवालसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आदित्य सातत्याने चर्चेत येत आहे. आतापर्यत सोशल मीडियावर आदित्यच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. आदित्यचं लग्न झाल्यामुळे त्याचे वडील आणि प्रसिद्ध गायक उदित नारायण चांगलेच आनंदात असून अलिकडेच त्यांनी एका मुलाखतीत आदित्य आणि श्वेताच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

‘स्पॉटबॉय’नुसार, श्वेता आणि आदित्य जवळपास १० वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते, असा खुलासा उदित नारायण यांनी मुलाखतीत केला आहे. “खरं तर माझ्या मुलाचं लग्न थाटामाटात व्हावं. सगळा मित्रपरिवार यावा अशी माझी मनापासून इच्छा होती. मात्र, करोनामुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळेच हे लग्न करोनाची साथ गेल्यानंतर करावं असं माझं मत होतं. मात्र, श्वेताच्या घरातले आणि आमच्या घरातले त्यासाठी मान्य नव्हते. त्यांना लवकरात लवकर लग्न करायचं होतं. श्वेता आणि आदित्य जवळपास १० वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते, त्यामुळे आता लग्न करण्याची आणि सगळ्यांसमोर हे नात्य मान्य करण्याची हीच योग्य वेळ होती”, असं उदित नारायण म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “करोनाच्या संसर्गामुळे अनेक जणांना या लग्नाला येणं शक्य झालं नाही. मात्र, त्या सगळ्यांनी शुभेच्छा पाठवल्या. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आदित्यला शुभेच्छा दिल्या ही खरंच फार आनंदाची बाब आहे. अमिताभ बच्चन यांनीही पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या”.

आणखी वाचा- “माझ्या पत्नीने धर्मपरिवर्तन केलंय”, राहुल महाजनचा खुलासा

दरम्यान, ‘शापित’ चित्रपटाच्या सेटवर आदित्य आणि श्वेताची ओळख झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. गेल्या १० वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखतात. आदित्य हा एक गायक आणि अभिनेता आहे. त्याने रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलचे सूत्रसंचालन केले आहे. तर, आदित्यची गर्लफ्रेंड श्वेता ही एक अभिनेत्री असून तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 3:24 pm

Web Title: aditya and shweta have been in a live in relationship for ten years ssj 93
Next Stories
1 ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील अभिनेत्रीने केले कोर्टात लग्न
2 राहुल बिग बॉसच्या घरातून का बाहेर पडला?- गौहर खान
3 शूटिंगदरम्यान वरुण धवनला करोनाची लागण
Just Now!
X