News Flash

आदित्य नारायण आणि त्याच्या पत्नीला करोनाची लागण

चाहत्यांना केली त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती

गायक आणि निवेदक आदित्य नारायण याने आपल्याला आणि आपल्या पत्नीला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्याने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसंच चाहत्यांना आपल्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही केलं आहे.

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आदित्य म्हणतो, “दुर्दैवाने माझी पत्नी श्वेता आणि माझी करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि आम्ही दोघेही क्वारंटाईन आहोत. सर्वांनी सुरक्षित राहा, सर्व नियम पाळत राहा आणि आमच्यासाठी प्रार्थना करा. हाही काळ निघून जाईल.”

त्याने ही पोस्ट करताच त्याचे चाहते आणि मित्र परिवार या दोघांनाही लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. गायिका नेहा कक्कर आणि अभिनेता राहुल सुधीर यांनीही या दोघांना लवकर बरे होण्यासाठी कमेंट्समधून शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्यने डिसेंबर २०२०मध्ये श्वेता अगरवालशी लग्न केलं. ते काही काळ एकमेकांना डेट करत होते. काही जवळचे नातेवाईक आणि मित्र यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला. लग्नानंतर या दोघांनी एकत्र आदित्य होस्ट करत असलेल्या ‘इंडियन आयडॉल १२’ या कार्यक्रमात हजेरीही लावली.

आदित्य हा प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे. त्याने काही चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केलं आहे. तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला. ‘शापित’ या हॉरर चित्रपटात आदित्य आणि श्वेता हे दोघे एकत्र दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 8:37 pm

Web Title: aditya narayan and his wife shweta tested positive for covid 19 vsk 98
Next Stories
1 लस घेताना रडला राम कपूर; नंदिता दास, रघू यांचंही झालं लसीकरण
2 अर्जुन रामपालच्या मुलाचा आणि गर्लफ्रेंडचा फोटो व्हायरल
3 भावंडं म्हणत १३ वर्षे लपवलं होतं नातं; आता समलैंगिक जोडप्याने घेतला वेगळं होण्याचा निर्णय
Just Now!
X