27 October 2020

News Flash

आदित्य आणि नेहाच्या लग्नामुळे उदीत नारायण यांना होणार हा फायदा?

एका मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या व्यक्तव्या वरुन या चर्चा सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडलच्या सेटवर गायिका नेहा कक्करच्या लग्नाच्या तयारी सुरु आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण नेहासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. त्यामुळे शो सध्या चर्चेत आहे. नेहाच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे. काही दिवसांपूर्वी आदित्यचे वडिल उदित नारायण आणि त्यांची पत्नी दीपा यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान उदित नारायण आणि आदित्य नेहाची मस्करी करताना दिसले.

‘मी हा शो पहिल्या दिवसापासून पाहिला आहे. त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे शोमधील सर्वच स्पर्धक टॅलेंटेड आहेत आणि दुसरं म्हणजे नेहा कक्करला सून म्हणून घरी आणण्याचा विचार करत आहे’ असे उदित नारायण म्हणाले होते. तसेच नेहाने आदित्यची आई दीपा यांना ‘सासू माँ’ म्हणून आवाज दिला होता. सर्वचजण सेटवर मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसत होते.

आणखी वाचा : नेहा कक्कर अडकणार लग्न बंधनात, या गायकाशी करणार लग्न?

नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये उदित नारायण यांना आदित्य आणि नेहाच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘नेहा खूपच गोड मुलगी आहे. मला ती आवडते. तिने तिच्या करिअरमध्ये चांगले नाव देखील कमावले आहे. मी तिचे गाणे ऐकत असतो. विशेष म्हणजे आदित्य आणि नेहाची चांगली जोडी जमली आहे. बाकी मला काही ठावूक नाही. जर त्यांचे लग्न झाले तर आमच्या घरात एक महिला गायिकेचा समावेश होईल. मला आवडेल’ असे म्हटले आहे. आदित्य आणि नेहाच्या लग्नानंतर त्यांच्या घरातील महिला गायिकेची कमी पूर्ण होणार. त्यामुळे उदित नारायण यांच्यासाठी हे लग्न फायद्याचे ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 4:57 pm

Web Title: aditya narayan and neha kakkar marriage is advantage for udit narayan avb 95
Next Stories
1 ‘बिग बॉस मराठी’ फेम रुपालीने पुण्याच्या मॉलमध्ये ‘त्या’ खास व्यक्तीला केलं प्रपोज
2 नैराश्यामुळे आलियाच्या बहिणीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
3 लवकर गेलास म्हणत लक्ष्याचा आठवणीने अशोक सराफ भावुक
Just Now!
X