News Flash

आदित्य नारायण लवकरच बनणार पिता?; हिंट देत शेअर केली ही गोड बातमी

होस्ट आदित्य नारायण लवकरच पिता बनणार असल्याची अद्याप तरी अधिकृत घोषणा केली नसली तरी त्याने स्वतः याबाबत एक हिंट दिलीय.

‘इंडियन आयडल’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमधील होस्ट आदित्य नारायणने नुकतंच छोट्या पडद्यावरील सुत्रसंचालनामधून ब्रेक घेणार असल्याची घोषणा केली. २०२२ हे सुत्रसंचालन करण्याचं शेवटचं वर्ष असणार आहे, असा खुलासा स्वतः आदित्यने एका मुलाखतीत केला आहे. तो लवकरच पिता बनणार आहे, म्हणून तो छोट्या पडद्यावरून ब्रेक घेणार असल्याचा अंदाज त्याचे फॅन्स लावत आहेत. कारण या मुलाखतीत बोलताना आदित्य नारायण याने पिता बनणार असल्याची हिंट दिली आहे.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक आणि सुत्रसंचालक आदित्य नारायण याला गायकापेक्षा जास्त सुत्रसंचालक म्हणून प्रेक्षक पसंती देतात. आदित्य अनेकदा एक अभिनेता आणि कॉमेडियनच्या रूपात सुद्धा प्रेक्षकांच्या समोर आलाय. आदित्य त्याच्या पर्सनल लाइफमुळे क्वचितच चर्चेत आलाय. गेल्या वर्षीच तो डिसेंबर २०२० मध्ये श्वेता अग्रवालसोबत विवाहबंधनात अडकला आहे.

प्रेग्नंट आहे श्वेता अग्रवाल?

आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाह लवकरच गोड बातमी देणार आहेत, असा अंदाज फॅन्स लावताना दिसून येत आहेत. आदित्यने स्वतः तशी हिंट सुद्धा दिलीय. आदित्यने नुकतंच ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ही हिंट दिली. या मुलाखतीत त्याने सुत्रसंचालना विषयी वक्तव्य केले आहे. “२०२२ हे वर्ष माझं सुत्रसंचालक म्हणून शेवटचं वर्ष असणार आहे. त्यानंतर मी सुत्रसंचालन करणार नाही. मला आता मोठ्या जबाबदाऱ्या पेलायच्या आहेत…”, असं त्याने या मुलाखतीत म्हटलंय.

यापुढे बोलताना आदित्य म्हणाला, “मी जेव्हा टीनएजर होतो, त्यावेळी मी छोट्या पडद्यावर सुत्रसंचालन सुरू केलं होतं…पुढच्या वर्षीपर्यंत मी हे काम सोडून देईल…मी कदाचित लवकरच पिता बनणार आहे…या इंडस्ट्रीने मला नाव, पैसा आणि यश दिलं आहे…माझं सुत्रसंचालनावर खूप प्रेम आहे…पण आता मला काही तरी मोठं करायचंय…मला आता गायचंय, स्टेजवर डान्स करायचाय…अख्ख्या जगासमोर दाखवून द्यायचंय…आणि यात यात कोणत्या अडचणी मला येऊ द्यायच्या नाहीत.”, असं देखील आदित्य नारायण म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 6:41 pm

Web Title: aditya narayan and shweta agarwal expecting their first baby singer gives hint prp 93
Next Stories
1 कॅप्टन दिलीप दोंदे आणि अभिनेता जितेंद्र जोशी खेळणार ‘कोण होणार करोडपती’
2 ब्रा स्ट्रॅप दाखवल्याने ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्री ट्रोल, पतीने नेटकऱ्याला दिलं सडेतोड उत्तर
3 ‘त्याला पॉर्न इंडस्ट्रीचा राजा बनायचं होतं’, अभिनेत्याने उडवली राज कुंद्राची खिल्ली
Just Now!
X