News Flash

आदित्य नारायणचा लहानपणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल; म्हणाला, “खूप मोठा गायक बनायचंय…”

आदित्य म्हणाला, "हे तर काहीच नाही...अजुन मला खूप मोठा गायक बनायचंय आणि खूप उंच शिखर गाठायचंय...आतापर्यंत यातलं केवळ ५ टक्केच मिळवलंय."

सुप्रसिद्ध गायक, अभिनेता आणि रिअ‍ॅलिटी शो होस्ट आदित्य नारायण हा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येतच असतो. आदित्य नारायण त्याच्या सोशल मीडियावर देखील बराच सक्रिय असतो. नेहमीच ठराविक कालावधीच्या अंतराने सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट शेअर करत असतो. आदित्य नारायणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात त्याची एक मुलाखत सुरू असल्याचं दिसून येतंय. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांवर निरागस भावनेने उत्तरे देताना दिसून येतोय.

आदित्य नारायणचा हा व्हिडीओ त्यावेळचा आहे, ज्यावेळी तो केवळ आठ वर्षाचा होता. आठ वर्षाचा आदित्य नारायण या व्हिडीओमध्ये त्याने पाहिलेल्या स्वप्नांच्या बाबतीत बोलताना दिसून येतोय. या व्हिडीओमध्ये आदित्य नारायण म्हणतोय, “हे तर काहीच नाही…अजुन मला खूप मोठा गायक बनायचंय आणि खूप उंच शिखर गाठायचंय…आतापर्यंत यातलं केवळ ५ टक्केच मिळवलंय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sudarshan (@notwhyral)

दुसऱ्या आणखी एका व्हिडीओमध्ये त्याला विचारलं जातं की तुला घरी कुणाचा ओरडा पडत नाही का ? यावर तितक्याच निरागस भावनेने तो उत्तर देतो, “हो, ओरडा पडलाच पाहीजे जर काही चूक झाली तर..”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sudarshan (@notwhyral)

आदित्य नारायणच्या लहानपणीचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना खूपच आवडलाय. आदित्य नारायणने एक बालकलाकाराच्या माध्यमातून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. करिअरच्या सुरवातीला त्याने अभिनेता शाहरूख खानच्या ‘परदेश’ चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर अभिनेता सलमान खानच्या ‘जब प्यार किसी से होता है’ चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आदित्यने बाल गायक म्हणून जवळपास १०० पेक्षा अधिक गाणे गायले आहेत. यासाठी त्याला ‘सर्वश्रेष्ठ बाल गायक’ पुरस्काराने गौरवण्यात देखील आलं. याशिवाय त्याने ‘शापित’ चित्रपटातून मुख्य भूमिका साकारण्यास सुरवात केली. सध्या तो ‘इंडियन आयडल १२’ या शोचं सुत्रसंचालन करतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 8:15 pm

Web Title: aditya narayan childhood video viral says want to be a big singer prp 93
Next Stories
1 प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर समोर आली मोठी माहिती; ‘या’ अभिनेत्याने केलं होतं डेट
2 ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट?
3 ‘मी स्वयंपाक का शिकला पाहिजे’, लिंगभेदावर विद्या बालन संतप्त
Just Now!
X