बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायक आणि अभिनेता आदित्य नारायणने गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी १ डिसेंबर रोजी लग्न केले आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये आदित्यने एका मंदिरात लग्न केले आहे. त्यानंतर त्याने रिसेप्शन पार्टी आयोजीत केली होती. या पार्टीला भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, गोविंदा अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली. आता आदित्यच्या हनिमूनचे फोटो समोर आले आहे.

आदित्य पत्नी श्वेतासोबत कश्मीरला फिरायला गेला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या हनिमूनचा पहिला फोटो व्हायरल झाला आहे. आदित्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने छान असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोमध्ये श्वेताने गुलाबी रंगाचा स्वेट टी-शर्ट परिधान केला आहे. तर आदित्यने जॅकेट परिधान केले आहे. फोटोमध्ये दोघेही अतिशय क्यूट दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या फोटोची चर्चा रंगली आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी लाइक आणि कमेंटाचा वर्षाव केला आहे.

गेल्या १० वर्षांपासून आदित्य श्वेताला ओळखत आहे. शापित चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. आदित्य हा प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा आहे. तो देखील गायक आणि अभिनेता आहे. त्याने रिअॅलिटी शो इंडियन आयडलचे सूत्रसंचालन केले आहे. त्याचवेळी शोमध्ये नेहा कक्कर परिक्षक म्हणून काम करत होती. त्यावेळी त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नेहाने वक्तव्य करत या सर्व चर्चांना पूर्ण विराम लावला होता. आदित्यची गर्लफ्रेंड श्वेता ही एक अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.