करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला होता. मोठ्या कंपन्यांपासून ते छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनाच लॉकडाउनचा फटका बसला. चित्रपटसृष्टीवर देखील याचा मोठा परिणाम झाला होता. लॉकडाउनमुळे पैसे संपल्यामुळे एका अभिनेत्याला चक्क त्याची बाईक विकावी लागली होती.
करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मालिका, चित्रपट, शो सर्वांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. त्यामुळे अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. अशातच गायक, अभिनेता आदित्य नारायणला देखील मोठा आर्थिक फटका बसल्याचे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले.
View this post on Instagram
आरंभ! #IIndianIdol @sonytvofficial @thecontentteamofficial @fremantleindia
नुकताच आदित्यने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने लॉकडाउनचा काळ कसा होता याबाबत वक्तव्य केले आहे. ‘लॉकडाउनमध्ये मी जितके पैसे सेविंग म्हणून ठेवले होते ते सगळे संपले. म्युच्युअल फंडमध्ये मी जितके पैसे गुंतवले होते सगळे काढून घेतले. माझ्याकडे दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता. माझ्याकडे केवळ १८००० रुपये शिल्लक होते. आता ऑक्टोबर महिन्यात देखील काम मिळाले नाही तर माझ्याकडे पैसेच उरणार नाहीत. मला या कठिण काळाला समोरे जाण्यासाठी बाइक देखील विकावी लागली. हा काळ माझ्यासाठी सर्वात कठिण आहे’ असे आदित्यने म्हटले आहे.
एकीकडे आदित्यचे लग्न अभिनेत्री श्वेता अग्रवालशी लग्न होणार आहे. तर दुसरीकडे तो आर्थिक संकटात अडकला आहे. आदित्यने एक सूत्रसंचालक म्हणून इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो सोनी वाहिनीवरील इंडियन आयडल या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 1:19 pm