बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायक आणि अभिनेता आदित्य नारायणने गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी १ डिसेंबर रोजी लग्न केले आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये आदित्यने एका मंदिरात लग्न केले आहे. आदित्यच्या लग्नाला भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, गोविंदा अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान रिसेप्शन पार्टीमधील आदित्यचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आदित्यच्या एका फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आदित्यच्या रिसेप्शन पार्टीमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघेही डान्स करताना दिसत आहे. दरम्यान आदित्यने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे तर श्वेताने लाल रंगाचा लाँग गाऊन परिधान केला आहे. ते दोघेही अतिशय सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या रिसेप्शनमधील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गेल्या १० वर्षांपासून आदित्य श्वेताला ओळखत आहे. शापित चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. आदित्य हा प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा आहे. तो देखील गायक आणि अभिनेता आहे. त्याने रिअॅलिटी शो इंडियन आयडलचे सूत्रसंचालन केले आहे. त्याचवेळी शोमध्ये नेहा कक्कर परिक्षक म्हणून काम करत होती. त्यावेळी त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नेहाने वक्तव्य करत या सर्व चर्चांना पूर्ण विराम लावला होता. आदित्यची गर्लफ्रेंड श्वेता ही एक अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.