01 March 2021

News Flash

फक्त चार कोटी? छे!.. आदित्य नारायणने सांगितली ५ बीएचके फ्लॅटची खरी किंमत

"इतक्या कमी किंमतीत मी घर विकत घेईन का?"

प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा व गायक आदित्य नारायणने नुकताच पाच बीएचके फ्लॅट खरेदी केला. अभिनेत्री श्वेता अगरवालशी त्याने लग्न केलं असून हे नवविवाहित दाम्पत्य या नवीन घरात राहणार आहेत. आदित्य विकत घेतलेल्या या फ्लॅटची किंमत चार कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र माझं फ्लॅट विकत घेण्याच्या क्षमतेला माध्यमांनी कमी लेखल्याचं म्हणत आदित्यने खरी किंमत सांगितली.

‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आदित्य म्हणाला, “फक्त चार कोटी? इतक्या कमी किंमतीत मी घर विकत घेईन का? बाजारभावापेक्षा तुम्ही कमी किंमत सांगितली. मी तो फ्लॅट साडेदहा कोटी रुपयांना विकत घेतला. मी लहान असल्यापासून इंडस्ट्रीत काम करतोय आणि टेलिव्हिजन मला माझ्या कामाचा मोबदला खूप चांगला देते.”

गायनासोबतच आदित्य रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनसुद्धा करतो. सध्या तो ‘इंडियन आयडॉल’ या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. आदित्यचं हे नवीन घर त्याच्या आईवडिलांच्या घरापासून तीन इमारती सोडून आहे. “मी अंधेरीतच पाच बीएचके फ्लॅट घेतला आहे. पुढील तीन-चार महिन्यांत आम्ही तिथे राहायला जाऊ”, असं त्याने सांगितलं.

आणखी वाचा- ‘आदित्य १० वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता’; उदित नारायण यांचा खुलासा

आदित्य आणि श्वेताने गेल्या आठवड्यात मुंबईत लग्नगाठ बांधली. गेल्या १० वर्षांपासून आदित्य श्वेताला ओळखत आहे. शापित चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2020 2:12 pm

Web Title: aditya narayan reveals actual cost of his new marital home ssv 92
Next Stories
1 Video: आणखी एका गाण्याचा रिमेक…; वरुण-साराचा ‘हुस्न है सुहाना’वरील डान्स पाहाच
2 Video : निहारिकाच्या लग्नात चिरंजीवी- अल्लू अर्जुनचा अफलातून डान्स; व्हिडीओ पाहून तुमचेही थिरकतील पाय
3 गरजूंना मदत करण्यासाठी सोनू सूदने ८ मालमत्ता गहाण ठेवून घेतलं १० कोटींच कर्ज?
Just Now!
X