बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न करणार असल्याचा खुलासा केला. आता तो १ डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे.

नुकताच आदित्यने या संदर्भात स्पॉटबॉयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने लग्न कधी आणि कुठे करणार असल्याचे सांगितले आहे. ‘मी १ डिसेंबरला लग्न करणार आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मी लग्न समारंभाला केवळ मोजक्या लोकांनाच बोलवणार आहे. तसेच लग्नसोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थित मंदिरात असणार आहे’ असे आदित्यने म्हटले आहे. तसेच पुढे त्याने नंतर कदाचित मोठे रिसेपशन आयोजित केले जाऊ शकते असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Working Sunday for us here. How are you spending yours? #IndianIdol #Day2 @sonytvofficial @thecontentteamofficial @fremantleindia

A post shared by Aditya Narayan (@adityanarayanofficial) on

यापूर्वी आदित्यने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते. ‘शापित चित्रपटाच्या सेटवर माझी आणि श्वेताची ओळख झाली. सुरुवातीला आमच्यामध्ये मैत्रीचे नाते होते आणि आम्हाला आमच्या करिअरवर लक्ष द्यायचे होते. गेल्या १० वर्षात आमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. येत्या डिसेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आम्ही लग्न बंधनात अडकणार आहोत. माझ्या कुटुंबीयांना श्वेता आवडते’ असे आदित्य म्हणाला होता.