कॉलेजमध्ये असताना आदित्य रॉय कपूरने माझ्या गर्लफ्रेंडला डेट केल्याचा किस्सा रणवीर सिंहने एका मुलाखतीत सांगितला होता. रणवीरच्या या मुलाखतीनंतर तीन वर्षांनी आता आदित्यने त्याविषयी खुलासा केला आहे. नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा सिझन २’मध्ये रणवीरने हजेरी लावली होती. तेव्हा त्याने डेटिंगचा हा किस्सा सांगितला होता. आदित्यला डेट करण्यासाठी गर्लफ्रेंडने माझ्यासोबत ब्रेकअप केलं, असं रणवीर म्हणाला होता.
“कॉलेजमध्ये असताना आदित्य रॉय कपूर हा मुलींमध्ये फार लोकप्रिय होता. प्रत्येकीला त्याला डेट करायचं होतं. मी एका मुलीसोबत चार ते पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. तिच्या प्रेमात मी अक्षरश: वेडा होतो. पण तिने आदित्य रॉय कपूरसाठी माझ्यासोबत ब्रेकअप केलं होतं”, असं रणवीरने नेहाच्या शोमध्ये सांगितलं.
आणखी वाचा : ‘जो कुछ इन्सान रिअल मे चाहता है..’; शाहिदसोबतचा फोटो पोस्ट करत करीनाने सांगितली आठवण
तीन वर्षांनंतर आदित्यने ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत नवीन खुलासा केला. गर्लफ्रेंडचा किस्सा सांगताना रणवीर फारच भावनिक झाला असेल असं म्हणत त्याने सांगितलं, “रणवीरचं ब्रेकअप झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी मी त्या मुलीला डेट करत होतो. रणवीरला कसं वाटलं असेल याचा कदाचित मी विचार केला नसेन.”
रणवीर आणि दीपिका पदुकोणचं लग्न झालं असून संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं. २०१८ मध्ये दोघांनी इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 10:41 am