News Flash

‘रोझ डे’ सेलिब्रेशन, आदित्यकडून कतरिनाला १ लाख गुलाबांची भेट

गुलाबांनी भरलेला ट्रक पाहून कतरिना थक्कच झाली आणि तिने आदित्यचे आभार व्यक्त केले.

कतरिनाला ट्रकभरून गुलाबं भेट देण्याची कल्पना रोझ डे च्या दोनच दिवस अगोदर आदित्यला सुचली.

‘फितूर’ चित्रपटाचे स्टारकास्ट आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांनी मोठ्या उत्साहात ‘रोझ डे’चे सेलिब्रेशन केले. ‘फितूर’च्या प्रमोशनसाठी कतरिना आणि आदित्य जयपूरच्या ‘जय महाल’मध्ये असताना ‘रोझ डे’च्या निमित्ताने आदित्यने यावेळी कतरिनाला १ लाख गुलाबं भेट देऊन सरप्राईज दिले. गुलाबांनी भरलेला ट्रक पाहून कतरिना थक्कच झाली आणि तिने आदित्यचे आभार व्यक्त केले.
कतरिनाला ट्रकभरून गुलाबं भेट देण्याची कल्पना ‘रोझ डे’ च्या दोनच दिवस अगोदर आदित्यला सुचली. त्यानंतर त्वरित तशी तयारी करण्यात आली आणि कतरिनाच्या नकळत आदित्यने ट्रकभरुन गुलाब मागविली.  दरम्यान, दिग्दर्शक अभिषेक कपूरचा ‘फितूर’ हा चित्रपट १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेत्री तब्बूचीही भूमिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2016 8:57 am

Web Title: aditya roy kapurs gift for katrina kaif a truck full of roses
टॅग : Katrina Kaif
Next Stories
1 भारत सहिष्णू देश; आयुष्यभर इथेच राहणार- कतरिना कैफ
2 मालिकांचे थांबणे..
3 मराठमोळ्या अनुजाची हिंदी ‘तमन्ना’!
Just Now!
X