News Flash

“तुम्ही भारतीय पदार्थ रोज खाता”; पाकिस्तानी युझरला अदनान सामीची कोपरखळी

अदानान सामीनं दाखवली शाब्दिक चतुराई

प्रसिद्ध गायक अदनान सामी सोशल मीडियावर प्रचंड असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो बिनधास्त प्रतिक्रिया देतो. आपल्या बिनधास्त प्रवृत्तीमुळे अनेकदा त्याच्यावर ट्रोल होण्याची वेळ देखील येते. मात्र ट्रोलर्सला तो गंमतीशीर उत्तर देऊन शांत करतो. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. अदनानने आपल्या आवडत्या पदार्थाचा फोटो ट्विट केला होता. या पदार्थावरुन एका पाकिस्तानी नेटकऱ्याने अदनानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र चकित करणारं उत्तर देऊन त्याने त्या पाकिस्तानी युझरचं तोंड बंद केलं.

अवश्य पाहा – विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान

अदनानने निहारीचा फोटो ट्विट केला होता. हा अदनानचा आवडता पदार्थ आहे. या फोटोवर एका पाकिस्तानी युझरने कॉमेंट केली. “पाकिस्तानचं राष्ट्रीय पदार्थ खाण्यासाठी धन्यवाद” असं म्हणत त्याने अदनानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अदनानने देखील आपल्या चतुराईचं दर्शन घडवलं.

अवश्य पाहा – “ही बाई आता काहीही बरळतेय”; अनुराग कश्यपने साधला कंगनावर निशाणा

“या पदार्थाचा शोध सर्वप्रथम लखनऊ येते लागला होता. व्वा ही तर कमाल झाली, एक भारतीय पदार्थ पाकिस्तानचं राष्ट्रीय खाद्य आहे. हे अगदी उर्दू भाषेसारखंच झालं.” अशा आशयाचं ट्विट करुन अदनानने त्या पाकिस्तानी नेटकऱ्याचं तोंड बंद केलं. अदनान सामीचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी अदनानच्या चतुराईचे कौतुक केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 7:23 pm

Web Title: adnan sami reaction on pakistani troller mppg 94
Next Stories
1 नोरा फतेही करणार लग्न, पाहा मजेशीर व्हिडीओ
2 “विधू विनोद चोप्रा यांनी मला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं होतं”
3 अभिनेत्याला सतावतेय चिंता; मुंग्यांना दिला करोनापासून सुरक्षित राहण्याचा सल्ला
Just Now!
X