News Flash

लता मंगेशकरांवर टीका करणाऱ्याला अदनान सामीने सुनावलं; म्हणाला..

अदनान सामीने सोशल मीडियावर आशा भोसले, लता मंगेशकर आणि नूर जहाँ यांचा फोटो पोस्ट केला होता.

गायक अदनान सामीने सोशल मीडियावर आशा भोसले, लता मंगेशकर आणि नूर जहाँ यांचा फोटो पोस्ट केला होता. एकीकडे सोशल मीडियावर या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत असताना एका युजरने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविरोधात कमेंट पोस्ट केली. त्या युजरने अदनानने सडेतोड उत्तर दिलं आहे.

अदनान सामीच्या पोस्टवर त्या संबंधित युजरने लिहिलं, ‘लता मंगेशकर यांचा आवाज खूप चांगला आहे, हे विचार करण्यासाठी भारतीयांचा ब्रेनवॉश केला गेलाय.’ यावर अदनानने उत्तर दिलं, ‘बंदर क्या जाने अदरक का स्वाद (हिंदीतल्या या म्हणीला समानार्थी मराठीतील म्हण- गाढवाला गुळाची चव काय?) स्वत:च्या प्रत्येक शंकेवर प्रश्न उपस्थित करून मूर्ख बनण्यापेक्षा गप्प राहावं.’

अदनानच्या उत्तरानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीसुद्धा लतादीदींसाठी काही ट्विट केले. ‘मी देवाकडे प्रार्थना करतो की, लता मंगेशकरांचा द्वेष करणाऱ्यांनी पुढच्या जन्मी आमच्यासारखे बनून जन्म घ्यावा, जेणेकरून त्यांना सौंदर्य आणि दिव्यता समजू शकेल. मी देवी सरस्वतीवर विश्वास ठेवण्यामागचं एक कारण म्हणजे लता मंगेशकर आहेत आणि दानवांवर विश्वास ठेवण्यामागचं कारण म्हणझे त्यांचा द्वेष करणारे लोक’, असं ट्विट त्यांनी केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:08 pm

Web Title: adnan sami slams person who said lata mangeshkar does not have a good voice ssv 92
Next Stories
1 Video: व्हिसा न घेताच अभिनेता पोहोचला दुबई अन्…
2 Video : सुदेश लहरींनी केली सूनबाईंची तक्रार; म्हणाले…
3 “वडिलांशी खोटं बोलून केली ही गोष्ट”; जान्हवी कपूरने केला खुलासा
Just Now!
X