23 March 2019

News Flash

‘शिकारी’मध्ये दिग्गज विनोदवीरांची वर्णी

या चित्रपटातून विनोदी कथानक पाहायला मिळणार की हा चित्रपट अडल्ट कॉमेडी असणार याबद्दलच बरेच तर्कवितर्क लावले जात होते.

वैभव मांगले, भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे

विजू माने दिग्दर्शित आगामी ‘शिकारी’ या मराठी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि उत्सुकता आहे. या चित्रपटातून विनोदी कथानक पाहायला मिळणार की हा चित्रपट अडल्ट कॉमेडी असणार याबद्दलच बरेच तर्कवितर्क लावले जात होते. या चित्रपटाच्या माध्यमातून तीन आघाडीचे विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास सज्ज झाले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ आणि इतर मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेले भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे आणि वैभव मांगले या चित्रपटांत महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या या चित्रपटाचे बोल्ड पोस्टर्स सर्वत्र झळकले आणि या चित्रपटाची चर्चा सुरु झाली. ‘अ लाफ रायट, अ सेक्स कॉमेडी विथ अ मेसेज’ असे ब्रीदवाक्य घेवून ही पोस्टर्स झळकली आहेत. नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे, तर तेवढीच महत्वाची भूमिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’फेम सुव्रत जोशीने यात साकारली आहे. त्यांच्याबरोबर भालचंद्र कदम, भरत गणेशपुरे आणि वैभव मांगले, कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे.

वाचा : हृतिकचं वडिलांशी पटत नसल्याने रखडतोय ‘क्रिश ४’

भालचंद्र कदम, भरत गणेशपुरे आणि वैभव मांगले या विनोदवीरांमुळे या चित्रपटाला एक वेगळ्या दर्जाचे मनोरंजनमूल्य प्राप्त होणार आहे. त्याचमुळे, वेगळ्या धाटणीचा, बोल्ड अशी या चित्रपटाची जी ओळख प्रस्थापित झाली आहे, त्याचबरोबर या चित्रपटाने मनोरंजनाच्या पातळीवरही वेगळ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत.

आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड निर्मित हा चित्रपट २० एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on April 16, 2018 6:38 pm

Web Title: adult comedy marathi movie shikari bhau kadam bharat shringarpure and vaibhav mangle