News Flash

Video: त्याने ‘किस’ करुन अनुष्काच्या गाण्याला दिली दाद

या व्हिडिओला लाखो नेटीझन्सन पसंत करत आहेत.

आपल्या प्रिय ड्यूड नावाच्या डॉगीला ऐ दिल है मुश्किलमधील गाणे सुनावताना अभिनेत्री अनुष्का शर्मा

बॉलिवू़डच्या पडद्यावर वेगवेगळे रंग दाखविणारे कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही क्षण हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. आघाडीचे अभिनेत्री अनुष्का शर्माने अशाच प्रकारे एक व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्टाग्रामअकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये  आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटातील गाणे अनुष्का आपल्या ड्यूडला अर्थात प्रिय असणाऱ्या डॉगीला ऐकवताना दिसत आहे. तिचे गाणे ऐकून डॉगी इतका खुश झाला की तिचे चुंबन घेऊन त्याने जणू तिचे कौतुकच केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एखाद्या प्रियकराने प्रेयसीला प्रपोज करावे. अशा पद्धतीने गुडघ्यावर बसून अनुष्का आपल्या प्रेमळ डॉगीला गाणे ऐकवताना दिसते.

अनुष्काने हा व्हिडिओ शेअर करताना ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या आणखी एका फॅनला भेटा असा उल्लेखही तिने केला आहे. अनुष्काने शेअर केलेल्या ११ सेकंदाच्या या व्हिडिओला लाखो नेटीझन्सनी पसंत केले आहे.ट्विटरवर या व्हिडिओने हजारो तर इन्स्ट्राग्रामवर लाखो नेटीझन्सनी व्हिडिओला पसंती दर्शविली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त  पक्का झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर २८ नोव्हेबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  चित्रपट प्रदर्शनापूर्वीच यातील गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. चित्रपटाच्या टायटल गाण्याशिवाय चन्ना मेरेया, बुलेया आणि ब्रेकअप या गाण्यांना प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहे. २८ नोव्हेबरला ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटासोबतच अजय देवगणचा ‘शिवाय’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट चाहत्यांच्या आकर्षित करणार याची उत्सुकता येणारा काळच ठरवेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 10:00 am

Web Title: ae dil hai mushkil actress anushka sharma kissed by her dog dude watch video
Next Stories
1 बुद्धावरील चित्रपटामुळे जनजीवनात बदल – गगन मलिक
2 करिनाने फवाद खानकडे केले दुर्लक्ष
3 ..म्हणून लांबणीवर गेला मलायका आणि अरबाजचा घटस्फोट?
Just Now!
X